Kim Jon Un : किम जोंग उन यांच्या मृत्यूची अफवा, उत्तर कोरियाची सत्ता त्यांच्या बहिणीकडे; सत्य काय?
Kim Jon Un : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्या निधनांची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोराने
Kim Jon Un : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्या निधनांची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोराने सुरु झाली आहे. किम जोंग उन यांनी प्योंगयांगमधील सत्तेची सूत्रे आपली बहीण किंवा मुलीकडे सोपवली असल्याची देखील चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर किम जोंग उन यांच्या मृत्यूबाबतच्या अफवा पसरत आहेत. ‘चायना डेमोक्रसी पार्टी’चे (CDP) प्रमुख वांगजुन शी यांनी असा दावा केला आहे की, उत्तर कोरियाच्या या नेत्याचा मेंदूतील रक्तस्रावामुळे (ब्रेन हॅमरेज) मृत्यू झाला आहे आणि त्यांची बहीण किम यो जोंग हिने त्यांची मुलगी किम जू-ए हिच्याऐवजी सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत.
किम जोंग उन यांच्याबद्दलच्या अफवा?
तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन पसरणारा हा दावा खोटा आहे. अमेरिकन वेबसाइट ‘एनके न्यूज’ (NK News) च्या वृत्तानुसार, त्यांच्या निधनाच्या अफवा सुरू असतानाच, सोमवारी (19 ऑक्टोबर, 2026 ) किम जोंग उन आपल्या मुलीसोबत कपडे आणि पादत्राणांच्या प्रदर्शनात उपस्थित असल्याचे दिसून आले. गेल्या एक-दोन दिवसांत ऑनलाइन अशा बातम्या पसरू लागल्या होत्या की, किम जोंग उन यांचा मृत्यू झाला आहे किंवा ते कोमात गेले आहेत आणि त्यांना उपचारांसाठी बीजिंगमधील रुग्णालयात नेण्यात आले आहे. ही अफवा सीडीपीच्या दोन नेत्यांनी पसरवली होती.
‘कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी’ (KCNA) नुसार, किम यांनी सोमवारी 19 ऑक्टोबर, 2026 ) प्योंगयांगमध्ये ‘नॅशनल गारमेंट अँड फूटवेअर एक्झिबिशन-2026 ‘ ला भेट दिली. या कार्यक्रमातील काही छायाचित्रांमध्ये ते आपली पत्नी आणि मुलीसोबत प्रदर्शनात फिरताना दिसत आहेत. या कार्यक्रमाबाबत बोलताना किम म्हणाले, “अशा लहान-मोठ्या उद्योगांतून या क्षेत्रातील वाढ दिसून येते. हे लोकांच्या जीवनातील प्रगतीचे प्रतीक आहे, त्यांच्या भौतिक आणि सांस्कृतिक कल्याणात सुधारणा घडवून आणते आणि वेगाने प्रगती करत आहे.”
भारताला कमजोर व विभाजित करण्याचे प्रयत्न ; मोहन भागवतांचा मोठा दावा
यापूर्वीही अशा अफवा पसरल्या होत्या
याआधी, 2020 मध्ये हाँगकाँगच्या एका मोठ्या मीडिया कंपनीतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने किम जोंग उन यांच्याबद्दल अशाच प्रकारच्या अफवा पसरवल्या होत्या. या दाव्याला काही प्रमाणात विश्वासार्हता मिळाली आणि तो एक महत्त्वाचा बातमीचा विषय बनला. मात्र, पुढे किम पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले तरीही, त्यांच्या प्रकृतीबाबत काही समस्या असाव्यात, असे स्पष्ट संकेत दिसून येत होते.