इंटरनेट अन् स्मार्टफोन वापरताय मग दर तासाला स्क्रीनशॉटही द्या; ‘या’ देशांत इंटरनेटचा वापर कठीणच!

इंटरनेट अन् स्मार्टफोन वापरताय मग दर तासाला स्क्रीनशॉटही द्या; ‘या’ देशांत इंटरनेटचा वापर कठीणच!

North Korea Internet : आजच्या काळात इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. कोणतही काम असो इंटरनेट शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. इंटरनेट मुळेच जग खूप जवळ आलं आहे. जगाच्या एखाद्या कोपऱ्यात एखादी घटना घडली तरी अगदी काही सेकंदात जगभरात व्हायरल होते. अशी परिस्थिती सध्या आहे. अधिक वेगवान इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी विविध देशांतील सरकारे प्रयत्न करत असताना असाही एक देश आहे जेथील लोकांना इंटरनेटचा वापर करणं अतिशय कठीण होऊन बसलं आहे. हा देश आहे उत्तर कोरिया. या देशात (North Korea) इंटरनेटवर सरकारचं पूर्ण नियंत्रण आहे.

जगभरात वापरल्या जाणाऱ्या इंटरनेटचा (Internet) वापर करणे उत्तर कोरियात सहज शक्य नाही. या देशात एक विशेष प्रकारचे डोमेस्टिक इंटरनेट उपलब्ध आहे. या इंटरनेटला येथे क्वांगम्याँग म्हटले जाते. हे इंटरनेट पूर्णपणे सरकार नियंत्रित आणि सेन्सर केलेली माहितीच फक्त उपलब्ध करून देऊ शकते.

अमेरिका आणि दक्षिण कोरियाला थेट आव्हान, उत्तर कोरियाने पुन्हा डागली क्षेपणास्त्रे

उत्तर कोरियात इंटरनेट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अतिशय मर्यादित आहे. लोकांच्या इंटरनेट वापरावर सरकारची अतिशय बारीक नजर राहते. देशातील नागरिक इंटरनेटच्या माध्यमातून काय पाहतात आणि कोणत्या गोष्टी शेअर करतात याची माहिती सरकारकडून सातत्यानं घेतली जात असते. इतकेच नाही तर लोकांच्या स्मार्टफोनची सुद्धा निगराणी होत असते.

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण दर तासाला युजरच्या स्मार्टफोनचा स्क्रीन शॉट घेऊन सरकारला पाठवला जातो. इंटरनेटवर फक्त तीच माहिती दिसते जिला सरकारकडून मंजुरी मिळालेली असते.

उत्तर कोरियात फक्त इंट्रानेट

उत्तर कोरियात इंटरनेट ऐवजी सरकारद्वारे नियंत्रित इंट्रानेट सर्व्हिस उपलब्ध आहे. या इंटरनेटवर नागरिक फक्त स्थानिक आणि सेन्सर केलेली माहितीच पाहू शकतात. जगभरात काय चाललं आहे, तिथे काय घडतं आहे आणखी कोणती माहिती आहे या कोणत्याच गोष्टीची माहिती लोकांना होऊ नये याची काळजी सरकारकडून घेतली जाते. त्यामुळे येथील लोकांना इंटरनेट वापरणं अतिशय कठीण झालं आहे.

हुकूमशाह किम जोंग घाबरला; उत्तर कोरियाकडून पुन्हा मिसाईल चाचणी 

स्मार्टफोन वाढले पण स्वातंत्र्य नाही

मागील काही वर्षांपासून उत्तर कोरियात स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. पण या फोनवर फक्त सरकारने मंजुरी दिलेलीच माहिती फक्त ऊपलब्ध होते. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जोडले तर गेले आहेत मात्र त्यांच्या प्रत्येक ऑनलाईन हालचालींची माहिती सरकारकडून घेतली जात असते. सरकारकडूनच अशी बंदी घातली जात असल्याने येथील लोक बाकीच्या जगापासून एकदमच वेगळे पडले आहेत. सरकारच्या या मनमानी कारभारा विरुद्ध लोकांकडूनही कोणताच प्रतिकार केला जात नाही. कारण या देशातील कायदे आणि शिक्षाही अतिशय कठोर आहे. हुकूमशहा किम जोंग उनच्या मनात काय येईल आणि काय आदेश निघतील याची काहीच शाश्वती नसते.

कोरियात डिजिटल स्वातंत्र्य नाहीच

आज जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेटच्या विस्तारावर अतिशय वेगाने काम होत आहे. पण उत्तर कोरियतील लोक अजूनही डिजिटल स्वातंत्र्यापासून वंचित आहेत. बाहेरच्या माहितीवर कोरिया सरकारने पूर्ण बंदी घातली आहे. उत्तर कोरिया सरकारच्या या धोरणामुळे हा देश बाकीच्या जगापासून अगदीच एकटा पडला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube