प्रत्येक वर्षी 25 सुंदर मुली, प्लेजर स्क्वाड अन् सनकीपणा; किम जोंगच्या कारनाम्यांचा पर्दाफाश

प्रत्येक वर्षी 25 सुंदर मुली, प्लेजर स्क्वाड अन् सनकीपणा; किम जोंगच्या कारनाम्यांचा पर्दाफाश

North Korea Kim Jong Un : उत्तर कोरिया ओळखला जातो तो सणकी हुकुमशहा किम जोंग उनच्या कारनाम्यांनी. अण्वस्त्रांची निर्मिती आणि स्पर्धा त्याच्यासाठी नवीन नाही. जनतेला त्रासण्यासाठी नवनवीन फर्मान सोडणे आणि या फर्मानांचं उल्लंघन झालं तर कठोरात कठोर शिक्षा ठरलेलीच. देशातील लोकांना या गोष्टी नवीन नाहीत पण याच कारनाम्यांमुळे किम जोंग उन जगभरात टीकेचा धनी ठरतो. या गोष्टींचा विचार मात्र त्याच्या खिजगणतीत नाही. आता याच किम जोंगबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. हा त्याचा कारनामा आतापर्यंत पडद्याआड होता. परंतु, या प्रकाराला द डेली स्टारच्या रिपोर्टमध्ये कोरियन युट्यूबर आणि लेखिका ओनमी पार्कने वाचा फोडली आहे.

उत्तर कोरियाचा सत्ताधीश किम जोंग उन दरवर्षी 25 अविवाहित मुलींची निवड करतो. या मुलींना त्याच्या प्लेजर स्क्वाडमध्ये सामील करतो आणि या मुलींशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. फक्त इतकंच नाही तर मुलींची निवड करताना सौंदर्य आणि राजकीय प्रामाणिकपणा या दोन गोष्टी की फॅक्टर असतात, असा दावा पार्क यांनी केला.

ओनमी 2007 मध्ये 13 वर्षांच्या असताना उत्तर कोरियातून पळून आधी दक्षिण कोरिया आणि नंतर अमेरिकेला गेल्या. यानंतर त्यांनी किम जोंगचे कारनामे जगासमोर आणण्याच्या उद्देशाने या प्रकाराला वाचा फोडली. प्लेजर स्क्वाडमध्ये मुलींची निवड कशी केली जाते याची अधिक माहिती देताना पार्क सांगतात, किम जोंगचे लोक शाळांमध्ये जाऊन सुंदर मुलींचा शोध घेतात. सुंदर मुली सापडल्या की मग त्यांच्या कौटुंबिक आणि राजकीय स्थिती काय आहे याची माहिती घेतली जाते.

अमेरिका आणि दक्षिण कोरियाला थेट आव्हान, उत्तर कोरियाने पुन्हा डागली क्षेपणास्त्रे

यानंतर पुढील टप्पा असतो वैद्यकिय तपासणीचा. या टप्प्यात मुलींची शारीरिक तपासणी केली जाते. त्यांच्या शरीरावर लहानशी जर खूण दिसली तरी त्या मुलींची निवड होत नाही. या चाचण्या झाल्यानंतर या मुलींना राजधानी प्योंगयांगला धाडण्यात येते. पुढे या मुलींचे काम फक्त किम जोंगच्या शारीरिक इच्छा पूर्ण करणे इतकेच राहते.

आता हा प्रकार कुणालाही संतापजनक वाटेल पण कोरियाच्या राज्यकर्त्यांची यामागे वेगळी धारणा आहे. याचाही खुलासा पार्क यांनी केला आहे. किम जोंगचे वडील किम जोंग इल यांचा असा विश्वास होता की किशोरवयीन मुलींशी शारीरिक संबंध त्यांना अमरत्व प्रदान करू शकतात. याचसाठी 1980 च्या दशकात त्यांनी सुंदर मुली निवडण्याचा निर्णय घेतला होता. 2011 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मुलगा किम जोंग उनच्या हाती सत्ता आली आणि या मुलानेही बापाचा हाच कित्ता गिरवला आहे.

हुकूमशाह किम जोंग घाबरला; उत्तर कोरियाकडून पुन्हा मिसाईल चाचणी

पार्क यांचे म्हणणे आहे की या स्क्वाडमध्ये तीन वेगवेगळे विभाग आहेत. यातील काही मुलींनी बॉडी मसाजचे ट्रेनिंग दिले जाते. एका विभागाचं काम फक्त किम जोंग आणि त्याच्या सोबतच्या लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य आणि गायन करण्याचं असतं. तर तिसऱ्या विभागातील मुलींचं काम शारीरिक इच्छा पूर्ण करण्याचं आहे. यातही ज्या मुली सर्वात सुंदर आहेत त्या किम जोंगकडे पाठवल्या जातात आणि कमी सुंदर मुली जनरल आणि अन्य राजकारण्यांना पाठवल्या जातात. या स्क्वाडमधील मुली ज्यावेळी वयाची पंचविशी पार करतात तेव्हा त्यांना रिटायर केले जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube