मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात नवी रोजगाराची संधी

Sanjay Sawkare :वस्त्रोद्योग विभागाने मंत्री संजय सावकारे (Sanjay Sawkare)यांच्या मार्फत सादर केलेल्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Sanjay Swakare

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खंबीर नेतृत्वातून आणि मार्गदर्शनातून महाराष्ट्रात नवीन उद्योगाची भर पडली आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने रोजगाराच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटी (शेंद्रा) मध्ये स्थित ‘ह्योसंग इंडिया प्रा. लि.’ या वस्त्रोद्योग घटकाला ‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८’ अन्वये सदर प्रकरणी होणारा निर्णय पूर्वोदाहरण म्हणून अन्य वस्त्रोद्योग घटकांना लागू राहणार नाही. याच्या अधीन राहून विशेष बाब म्हणून म्हणून 12,124.84 लाख रुपयेचे भांडवली अनुदान देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

यामुळे महाराष्ट्रातील युवकांना आणि नागरिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. ​मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयानुसार वस्त्रोद्योग विभागाने मंत्री संजय सावकारे (Sanjay Sawkare)यांच्या मार्फत सादर केलेल्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होणार आहे. या विशेष निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा टेक्निकल टेक्स्टाईलचे एक प्रमुख केंद्र म्हणून उभारी घेणार आहे. या भागातील आर्थिक प्रगतीला आणि रोजगार निर्मितीला मोठी बळकटी मिळणार आहे.


प्रकल्पात एकूण किती गुंतवणूक असणार ?

ह्योसंग इंडिया प्रा. लि. ​हा एक विशाल टेक्निकल टेक्स्टाईल प्रकल्प असून ही कंपनी पुढील पाच वर्षांत 1273.33 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पात स्थापित पात्र मशिनरीची मूळ किंमत 24,249 लाख आहे. या रकमेच्या 50 टक्केच म्हणजेच 12,124 लाख इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे.

रोजगार निर्मिती किती?
तर या प्रकल्पात सध्या प्रत्यक्षरीत्या 430 रोजगार निर्मिती झाली आहे. अप्रत्यक्षरीत्या 280 रोजगार निर्मिती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिशील नेतृत्वामुळे आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नवे उद्योग व जागतिक गुंतवणूक आकर्षित होत आहे. महाराष्ट्राचा कायापालट करणे आणि तरुणांच्या हाताला रोजगार देणे हे राज्य सरकारचे मुख्य ध्येय आहे. ह्योसंग इंडिया या अद्ययावत प्रकल्पाला 12,124. 84 लाख रुपयांचे भांडवली अनुदान मंजूर झाल्याने वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठी संजीवनी मिळेल आणि हजारो रोजगाराचे मार्ग खुले होतील, असे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी म्हटले आहे.

follow us