‘मला दोष मुक्त करा’, वाल्मिक कराडचा अर्ज; पण न्यायालयाने… उज्वल निकमांनी काय सांगितलं?

‘मला दोष मुक्त करा’, वाल्मिक कराडचा अर्ज; पण न्यायालयाने… उज्वल निकमांनी काय सांगितलं?

Special Public Prosecutor Ujjwal Nikam on Santosh Deshmukh case Hearing and Valmik karad application : बीडमधील गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज 22 जुलै 2025 रोजी सुनावणी पार पडली. यामध्ये आरोपी वाल्मिक कराडचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. याबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

वाल्मिक कराडने संतोष देशमुखच्या खटल्यातून मला दोष मुक्त करावं. याबाबत अर्ज दिला होता. तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे. त्याचबरोबर दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे दोष मुक्त करावे अशा प्रकारे अर्ज केला होता. त्यावर जोरदार हरकत घेतली गेली. न्यायालयाला सांगितले ही आरोपींची मोडस ऑपरेंटी आहे. आरोपींनी एकदा दोष मुक्तीचा अर्ज केला. तर अशा रीतीने वेळचा अपव्यय करायचा खटला लांबवायचा हा त्यांचा प्रयत्न आहे.

सामना रद्द झाल्याने खवळला पाकिस्तान, भारताविरुद्ध घेतला ‘हा’ निर्णय; नुकसान कुणाचं?

न्यायालयाला विनंती केली. सर्व आरोपींना दोष मुक्तीचा अर्ज करायचा असेल तसा करावा. आज विष्णू चाटेपासून उर्वरित सर्व आरोपींनी देखील दोष मुक्तीचा अर्ज केला आहे. या सर्व अर्जला खुलासा दिला आहे. तसेच वाल्मिक कराडने जामिनावर मुक्तता करावी असा देखील अर्ज केला. त्यावर देखील आम्ही आमचे म्हणणे मांडून विरोध केला आहे. आज न्यायालयात ड्राफ्ट चार्ज करून वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदारा विरोधात वेगवेगळ्या कलमाखाली 12 ते 13 आरोप निश्चित केले जावे असा विनंती अर्ज केला आहे. या अर्जाची सुनावणी पुढे होणार आहे.

ब्रेकिंग! राष्ट्रपतींनी स्वीकारला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी जे दोष मुक्तीचे अर्ज केले आहेत ते उशिरा दाखल केले आहे. आरोप पत्र दाखल केल्यानंतर दोन महिन्यात अर्ज करणे अपेक्षित होतं. मात्र त्यांनी तो अर्ज केला नव्हता. न्यायालयाने अर्ज फेटाळावे अशी देखील आम्ही मागणी केली आहे. 4 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे. अशी माहिती यावेळी निकम यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube