शिंदे गटाच्या चार नेत्यांची SIT चौकशी करा; संजय राऊतांनी थेट नावं घेत CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी

Sanjay Raut Demands SIT Investigation of Eknath Shindes Four Leader : शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनेक मुद्द्यांवर थेट आणि आक्रमक भाष्य केलं. सर्वप्रथम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत बोलताना त्यांनी जनतेच्या भावना अधोरेखित करत म्हटलं, राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं ही लोकांची इच्छा (Maharashtra Politics) आहे. दोघांनीही आपल्या भाषणांमधून बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अशा गोष्टींवर फारशी चर्चा न करता योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातात.
स्वतंत्र एसआयटीची मागणी
त्याचबरोबर त्यांनी सत्ताधारी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. शिंदे गटातील (Eknath Shinde) मंत्र्यांवर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Shiv Sena) यांच्याकडे केली. “संजय राठोड, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, उदय सामंत यांच्यावर शंभर कोटींपेक्षा जास्त घोटाळ्याचे आरोप आहेत. एका ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटींची जमीन कशी जाऊ शकते? हे गंभीर प्रकरण आहे. यासाठी स्वतंत्र एसआयटीची (SIT Investigation) स्थापना करावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
होमिओपॅथी डॉक्टरांना राज्य सरकारचा दणका! ॲलोपॅथी उपचाराची परवानगी रद्द, निर्णय घेतला मागे
सरकार मुंबई विकायला निघालं
राऊतांनी धारावी पुनर्वसन प्रकल्पावरूनही सरकारवर टीका करत म्हटलं की, धारावीच्या नावाखाली अदानी समूहाला जमिनी वाटल्या जात आहेत. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केलं जातंय. सरकार मुंबई विकायला निघालं आहे. शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को वारसा दर्जा मिळाल्यानंतर सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या सोहळ्यांवर टीका करत राऊत म्हणाले, भाजपने हे किल्ले बांधले आहेत का? आता सोहळ्यांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीही अनेक ऐतिहासिक स्थळांना वारसा दर्जा मिळाला आहे, तेव्हा एवढं राजकारण केलं का? असा सवाल देखील राऊतांनी यावेळी केला.
Jalgaon Crime : खेळातलं वैर जीवावर बेतलं; शाळेच्या मैदानावरच मारहाण, नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
जनतेच्या भावना महत्वाच्या…
महापालिका निवडणुकांविषयी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की, निवडणुका जाहीर झाल्यावर योग्य वेळेस निर्णय घेतले जातील. जनतेच्या भावना महत्वाच्या आहेत. राऊतांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटाच्या आगामी भूमिका आणि युतीच्या शक्यतेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.