Jalgaon Crime : खेळातलं वैर जीवावर बेतलं; शाळेच्या मैदानावरच मारहाण, नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Ninth Student Died In School Ground Jalgaon : जळगावमधील (Jalgaon) आर आर विद्यालयाच्या मैदानावर एक धक्कादायक घटना घडली आहे. मैदानावर खेळताना नववीतील विद्यार्थी कल्पेश इंगळे याचा शुक्रवारी मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघात म्हणून (Crime News) वाटली. मात्र पोलीस तपासानंतर घटनेचा धक्कादायक खुलासा झालाय.
अंगावर जखमा
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश इंगळे आणि त्याच वर्गातील एक अल्पवयीन विद्यार्थी यांच्यात खेळाच्या वेळी वाद झाला. हा वाद पुढे कट्टरतेत रूपांतरित झाला आणि मारहाणीच्या घटनेत (Ninth Student Died In School Ground) बदलला. कल्पेशच्या अंगावर जखमांचे पुरावे मिळाले आणि त्याच्या मृत्यूचे कारण मारहाण असल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मारहाणीची गंभीर तक्रार दाखल करण्यात आलीय. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपी अल्पवयीन विद्यार्थी पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सहा लिटर दूध, पाच किलो साखर, एका तासात 13 किलो सुकामेवा फस्त; MP मध्ये गजब कारनामा
भांडणात मारहाण
कल्पेशचा त्याच्याच वर्गातल्या दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत झालेल्या भांडणात मारहाणीदरम्यान मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालंय. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वर्गातल्या विद्यार्थ्यासोबत वाद
शाळेत खेळत असताना कल्पेशाचा त्याच्याच वर्गातल्या विद्यार्थ्यासोबत वाद झाला. या वादातून झालेल्या मारहाणीत कल्पेश याचा मृत्यू झाला झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 22 तासानंतर आज मयत विद्यार्थ्याचं शवविच्छेदन करून त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापनाविरुद्ध देखील कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी मयत कल्पेश याच्या पालकांनी केली आहे. शाळा व्यवस्थापनाची देखील चौकशी केली जाणार असून चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी सांगितले.