Maharashtra Politics : कॉंग्रेसमुक्त भारत करताना भाजपच कॉंग्रेसयुक्त झाला; सपकाळांचा टोला

Harshvardhan Sapkal : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसला (Congress) फोडा, कॉंग्रेस रिकामी करा असा कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला होता. यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी भाष्य केलं. काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे, असा टोला सपकाळ यांनी लगावला.
Video : दहशतवाद्यांच्या लढाईला पाकिस्तानने स्वतःची लढाई केली; सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेतून ‘वार’
हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की, काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाहीर व्यक्त करत आहेत. पण काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे, हे त्यांनी अगोदर लक्षात घ्यावे. अनेक जण अडचणीमुळे भाजप पक्षात जात असले तरी अजूनही काँग्रेस संपलेली नाही, यातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा, असं सपकाळ म्हणाले.
“काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाहीर व्यक्त करत आहेत. पण काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे, हे त्यांनी अगोदर लक्षात घ्यावे. अनेक जण अडचणीमुळे भाजप पक्षात जात असले तरी अजूनही काँग्रेस संपलेली नाही यातून त्यांनी काहीतरी बोध… pic.twitter.com/vf2sYHxeEo
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) May 12, 2025
Video : ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी; पुढील मिशनसाठी लष्करी तळ, सिस्टम रेडी; पाकला भारताचा मोठा मेसेज
बावनकुळे काय म्हणाले होते?
राज्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी बावनकुळेंनी कॉंग्रेसला फोडा असं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, काँग्रेसला लोकं सोडून जात आहेत. संग्राम थोपटे यांनी सगळं आयुष्य कॉंग्रेसला दिलं तरीसुद्धा त्यांना पक्ष सोडावा लागला. त्यांना त्यांच्या पक्षाकडून, राहुल गांधींकडून अपेक्षा नाहीत. कॉंग्रेसकडे कोणतंही धोरण नाही… जो जो कॉंग्रेस किंवा इतर पार्टीमधून आमच्याकडे येईल त्यांचं भाजपमध्ये स्वागत आहे. कॉंग्रेसला फोडा, कॉंग्रेसला रिकामी करा, असं बावनकुळे म्हणाले होते.
दरम्यान, बावनकुळेंच्या या वक्तव्यावर आमदार वडेट्टीवार यांनी भाजपाला थेट इशारा दिला होता. आज तुमचे दिवस आहेत, आमचेही दिवस येतील, हम भी चुन चुन कर बदला लेंगे, असं ते म्हणाले होते. तर आता सपकाळ यांनी कॉंग्रेसमुक्त भाजप करता करता भाजपचा कॉंग्रेसयुक्त झाला, असा टोला लगावला. सपकाळ यांच्या या टीकेवर आता भाजपचे नेतेमंडळी काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.