Video : दहशतवाद्यांच्या लढाईला पाकिस्तानने स्वतःची लढाई केली; सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेतून ‘वार’

Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर आज पुन्हा एकदा भारतीय लष्कराच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. (Sindoor) भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांच्या उपस्थितीत या पत्रकार परिषदेतून भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी, ऑपरेशन सिंदूर आणि सीमारेषेवरील कारवायांसंदर्भात देशवासीयांना सांगण्यात आलं.
आमचा लढा पाकिस्तानच्या लष्काराशी नसून दहशतवादी अन् दहशवाद्यांशी असल्याचे लष्करप्रमुख ए.के. भारती यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. “आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणूनच आम्ही सर्वात आधी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या लढाईला स्वतःची लढाई बनवली, म्हणून त्यांना प्रत्युत्तर देणे आवश्यक होते.”, असे एअर मार्शल ए. के. भारती यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला होता, ऑपरेशन सिंदूर’बद्दल लष्कराचा मोठा खुलासा
आपली हवाई सुरक्षा प्रणाली म्हणजेच एअर डिफेन्स सिस्टीम देशासाठी अभेद्य भींत बनून उभी होती. या भींतीला धडक देणे शत्रू राष्ट्राला अशक्यच होते, असे भारती यांनी म्हटले. तसेच, ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय वायू दलाने दहशतावाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्याचे काही फोटो व व्हिडिओ दाखवले. भारताच्या एकाही एअर बेसवर शत्रू राष्ट्राकडून हल्ला झाला नाही. भारतीय हवाई दलाचे सर्वच तळ सुरक्षित आहेत. हवाई दलाने कुठल्याही संशयास्पद वस्तूला एअर बेसजवळ पोहोचू दिले नाही.
व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद म्हणाले की, हवाई क्षेत्रासह सतत देखरेख स्थिर करण्यासाठी सागरी दलाचा वापर करण्यात आला. नौदल एकाच वेळी हवाई, भूपृष्ठ आणि भूपृष्ठावरील धोके शोधण्यात सक्षम होते. सागरी दल सतत देखरेख सुनिश्चित करण्यास सक्षम होते. अनेक सेन्सर्स आणि इनपुटचा प्रभावीपणे वापर करून आम्ही सतत देखरेख ठेवत आहोत. म्हणूनच आम्ही या धोक्यांना निष्प्रभ करू शकलो. आम्ही जास्तीत जास्त रडारचा वापर केला आणि सर्व उडत्या वस्तूंवर लक्ष ठेवले, मग ते ड्रोन असोत, लढाऊ विमान असोत. हे सर्व एका जटिल स्तरित संरक्षण यंत्रणेच्या छत्राखाली चालवले जातात.