Operation Sindoor : जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फेल; ‘जैश’चे १० ते १२ दहशतवादी ठार

India-Pakistan : भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर काल गुरुवार रात्री उशीरा दहशतवाद्यांच्या एका गटाने सांबा येथे आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सतर्क असलेल्या बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) जवानांनी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे 10 ते 12 दहशतवादी ठार केल्याची माहिती समोर आली आहे. (India) हा केवळ घुसखोरीचा प्रयत्न नव्हता, तर ही पाकिस्तान सैन्याच्या बॉर्डर अॅक्शन टीमची (BAT) नापाक कारवाई असण्याची शक्यता असल्याचंच म्हटलं जातय.
गस्त वाढवली
तर दुसरीकडे, सीमेला लागून असलेल्या भागांमध्ये बीएसएफने गस्त वाढवली आहे. रात्री आठ वाजता पाकिस्तानी सैन्याने सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भारतीय ठिकाणांवर गोळीबार सुरू केला. त्याच वेळी पाकिस्तानकडून ड्रोन हल्लेही सुरू झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारी दरम्यान स्वयंचलित शस्त्रांनी सज्ज दहशतवाद्यांना सीमा ओलांडून भारतीय हद्दीत येताना बीएसएफच्या जवानांनी पाहिले. जवानांनी दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत पाकिस्तानी गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानी पीएम शाहबाज शरीफांच्या घराजवळ भीषण स्फोट; 20 किलोमीटर अंतरावर झाला स्फोट
रात्री सुमारे 11.30 वाजता दहशतवाद्यांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. जवानांनी तत्काळ गोळीबार सुरू केला. दरम्यान, पाकिस्तानी सैन्यानेही गोळीबार अधिक तीव्र केला; पण बीएसएफच्या जवानांनी ठामपणे प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना चकमकीत गुंतवले. दोन्ही बाजूंनी सुमारे 40 मिनिटे गोळीबार सुरू होता.
पाकिस्तानच्या हद्दीत पळाले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी ठार झाले असून काहीजण परत पाकिस्तानच्या हद्दीत पळून गेले असावेत. त्यातील काहींना पाकिस्तानी भागात खाली पडताना पाहण्यात आले आहे. यांची संख्या सुमारे 10 ते 12 असल्याचे मानले जात आहे.