Video: PM मोदी ‘किलर’ तर, पाकचा असीम मुनीर ‘महान सेनानी’; ट्रम्प पुन्हा बरळले

अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळेच भारत-पाक संभव्य युद्धाला रोखण्यात यश. तणावाच्या परिस्थितीत आपण मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधानांशी संपर्कात होतो

  • Written By: Published:
Video: PM मोदी 'किलर' तर, पाकचा असीम मुनीर 'महान सेनानी'; ट्रम्प पुन्हा बरळले

Trump praises ‘killer’ Modi, shares update on trade deal with India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकचे नेते असीम मुनीर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मुनीर हे एक महान सेनानी असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहेत. तर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आदर असून, मोदी यांचे वर्णन एक देखणा पण अतिशय कणखर व्यक्ती असे केले आहे. मोदींना पटवणे कठीण आहे आणि ते झुकण्यास नकार देतात असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, मोदींचे कौतूक करताना ट्रम्प यांनी किलर हा शब्द उच्चारल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दक्षिण कोरियातील APEC सीईओ शिखर परिषदेत डोनाल्ड ट्रम्प बोलत होते.

पंतप्रधान मोदी चांगली व्यक्ती पण….

दक्षिण कोरियामध्ये बोलताना ट्रम्प यांनी अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळेच भारत आणि पाकिस्तानमधील संभव्य युद्धाला रोखण्यात यश आले. दोन्ही देशांमधील तणावाच्या परिस्थितीत आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान दोघांशीही सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले.

पाकचा मुनीर महाना सेनानी

मोदींचे कौतूक केल्यानंतर ट्रम्प यांनी पाकच्या पंतप्रधानांचेही कौतुक केले. ट्रम्प म्हणाले की, पाकिस्तानी पंतप्रधानदेखील एक चांगली व्यक्ती आहे. तसेच त्यांच्याकडे ‘फील्ड मार्शल’ आहे, जो एक अतिशय शूर योद्धा आहे.

भारतातसोबत व्यापर करार करणार

पुढे बोलताना ट्रम्प यांनी अमेरिका भारतासोबत व्यापार करार करणार असून, मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. आमचे संबंध खूप चांगले आहेत. एवढेच नव्हे तर,मोदी हे सर्वात सुंदर दिसणारी व्यक्ती आहेत, पण ते किलर आणि कठोर आणि हट्टी असल्याचे ट्रम्प म्हणाले.

follow us