Iran : एक माराल तर, दोन खावे लागतील! इराणचा 3 कलमी ‘मास्टरप्लॅन’; ट्रम्प-नेतान्याहूंची झोप उडाली!
Iran Israel War इराणने गेल्या दोन आठवड्यांत इस्रायलवर 10 हजाराहून अधिक क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोन डागून जगाला हादरवून सोडले आहे.
Iran Israel War Update : गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाने आता प्रलयंकारी वळण घेतले आहे. हे युद्ध केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहिले नसून, संपूर्ण मध्यपूर्व (मिडल ईस्ट) यात होरपळून निघण्याची चिन्हे आहेत. इराणने पुकारलेल्या या ‘मिसाईल वॉर’मुळे इस्रायलसह अमेरिकेच्या गोटातही खळबळ उडाली आहे.
Strait of Hormuz : इराण-अमेरिका युद्धात होर्मुझची जगभर चर्चा! पण, ‘होर्मुझ’ नाव कसं पडलं? अर्थ काय?
1. इस्रायलमध्ये हाहाकार : 10 हजार क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा
इराणने गेल्या दोन आठवड्यांत इस्रायलवर 10 हजाराहून अधिक क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोन डागून जगाला हादरवून सोडले आहे. या अभूतपूर्व हल्ल्यामुळे इस्रायलची जगप्रसिद्ध ‘आयर्न डोम’ आणि ‘डिफेंस सिस्टम’ खिळखिळी झाली आहे. यामुळे इस्रायलमधील परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की, रुग्णालयांत जखमींना ठेवायला जागा उरलेली नाही. अनेक रुग्णांवर जमिनीवर आणि बेसमेंटमध्ये उपचार करण्याची वेळ आली आहे. Iran Israel War Update
2. मोजतबा खामेनेईंचा ‘कमांडिंग’ अवतार, अमेरिकेला थेट अल्टिमेटम
अयातुल्ला अली खामेनेई यांच्यानंतर इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून समोर आलेल्या मोजतबा खामेनेई यांनी गुरुवारी (12 मार्च) आपल्या पहिल्याच भाषणात रणशिंग फुंकले आहे “मिडल ईस्टमध्ये असलेले अमेरिकेचे सर्व लष्करी तळ तातडीने रिकामे करा, अन्यथा आमचे हल्ले थांबणार नाहीत,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. शत्रूने केलेल्या प्रत्येक नुकसानीची वसुली ‘सडेतोड’ पद्धतीने केली जाईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे.
3. जगाची ‘लाईफलाईन’ रोखली, हॉर्मुझची सामुद्रधुनी बंदच
इराणने जागतिक अर्थव्यवस्थेची नस दाबली आहे. जगातील तेलाच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद ठेवण्याचा निर्णय इराणने कायम ठेवला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हा मार्ग उघडला जाणार नाही, या भूमिकेमुळे जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बदला घेणार आता थांबणार नाही…, खामेनी इज बॅक… ट्रम्प यांची धाकधूक वाढवणारा व्हिडिओ व्हायरल
4. शेजारील देशांमध्ये दहशतीचे सावट
इराणच्या इस्त्राइल आणि अमेरिकेवरील आक्रमक हल्ल्यांमुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बहरीन आणि कुवैतमधील तेल साठ्यांवर केलेल्या हल्ल्यांनंतर इराकने आपले सर्व ‘ऑईल पोर्ट ऑपरेशन्स’ बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बहारिन, कुवेत, सौदी अरेबिया आणि यूएई यांसारखे देशही आता युद्धाच्या छायेखाली वावरत आहेत.
5. इराणचा 3 कलमी मास्टरप्लॅन
इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी जागतिक समुदायासमोर तीन अटी ठेवल्या आहेत, ज्या इराणची आक्रमक जिद्द अधोरेखित करतात यात
-
भरपाई : शत्रू राष्ट्राने इराणच्या नुकसानीची पूर्ण भरपाई करावी.
-
जशास तसे उत्तर : इराणच्या नुकसानीइतकेच नुकसान शत्रूचे केले जाईल.
-
सुरक्षेची हमी : भविष्यात अशी आक्रमकता दाखवली जाणार नाही, याची आंतरराष्ट्रीय समुदायाने लेखी हमी द्यावी.
युद्ध आखातात अन् गॅस टंचाई भारतात; सर्वसामान्यांच्या घरात पहिल्यांदा कसा अन् कधी पोहचला LPG
थोडक्यात काय तर, अमेरिका आणि इस्रायल हे युद्ध थांबवण्याचे दावे करत असले, तरी जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे. इराण आता “एक माराल तर दोन खावे लागतील” या तत्त्वावर लढत असून, मोजतबा खामेनेईंच्या नेतृत्वाखाली इराण अधिक आक्रमक झाला असून, हे युद्ध आता जागतिक शांततेसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
