पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती! संतप्त नागरिक रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
POK Protest : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्याची परिस्थिती भयावह आहे. दैनंदिन लागणाऱ्या वस्तुंचा दर गगणाला भिडल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये पीठ, वीज या गोष्टींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. (POK) यावरून संतप्त झालेला जमाव आता सरकारविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर येऊन दगडफेक करण्यापर्यंत गेला आहे. (POK Protest) यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.
अनेक ठिकाणी गोळीबार
पीओकेच्या मीरपूर जिल्ह्यात 70 पेक्षा अधिक लोकांना अटकर करण्यात आली असून, या घनांमुळे संतप्त जवान आता रत्त्यावर उतरून सुरक्षा दलांवर देगडफेक करत आहे. यामध्ये अनेक ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले आहेत. तसंच, काही नागरिकही जखमी झाले आहेत. दरम्यान, सरकार विरोदात निदर्शने करणाऱ्या नागरिकांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
लोकांना ताब्यात घेतलं
वाढती महागाई, कर आणि विजेचा तुटवडा यामुळे संतप्त झालेले नागरिक पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. या दरम्यान, जनता आणि सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका पोलिसाचा मृत्यू झाला. दरम्यान, पीओकेच्या लोकांनी शनिवारी 11 मे रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची योजना आखली होती. अगोदरच लोकांना ताब्यात घेतल्याने हा संघर्ष अधिक तीव्र झाला.
जमावबंदी लागू
या संघर्षात पीओकेच्या मीरपूर जिल्ह्यात सुमारे 70 पेक्षा अधिक लोकांना अटक केली. यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर आला. त्यानंतर अनेक चकमकी झाल्या. त्यामध्ये अनेकजण जखमी झाले. प्रशासनाकडून येथे 144 (जमावबंदी) लागू करण्यात आली. पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्यासाठी जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीने संप पुकारला होता. यामध्ये पोलिसांनी संपादरम्यान अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या तसंच हवेतही गोळीबार केला.
पाकिस्तानवर कर्जाचं ओझ
पाकिस्तानमध्ये सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. येथील नागरिक या माहागाईशी लढत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तीन अब्ज डॉलरचं पाकिस्तानला कर्ज मंजूर केलं. परंतु, हे करत असताना कठोर अटी घातल्या होत्या, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. विजेचे दर वाढल्याने अडचणी वाढल्या असून पाकिस्तानातील लोकांना अखेर रस्त्यावर उतरावं लागलं आहे.