पाकिस्तानचा अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक, 8 जणांचा मृत्यू; युद्धासारखी स्थिती, सैन्य आमनेसामने

पाकिस्तानचा अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक, 8 जणांचा मृत्यू; युद्धासारखी स्थिती, सैन्य आमनेसामने

Pakistan Taliban Attacks : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात पुन्हा युद्धजन्य (Pakistan Taliban Attacks) परिस्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानात तालिबान शासन आल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव कमी होईल असे वाटत होते. परंतु, तसे होताना दिसत नाही. या दोन्ही देशांत युद्ध भडकेल की काय अशी चिन्हे आता दिसू लागली आहे. दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले आहे. पाकिस्तानी वायूसेनेने सोमवारी सकाळी अफगाणिस्तानात हवाई हल्ले केल्याने तणाव वाढल्याचे सांगितले जात आहे. यानंतर तालिबान सरकारने पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेतले आहे.

Pakistan News : पाकिस्तानात इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज; अनेकांना अटक

अफगाणिस्तान सरकारच्या विदेश मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. अफगाणिस्तान सरकारने देशात झालेल्या हवाई हल्ल्यांसंदर्भात पाकिस्तानी प्रभारींना समन्स बजावण्यात आला आहे. अफगाणिस्तानचे म्हणणे आहे की पाकिस्तानकडून तालिबानी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. दोन्ही देशांतील डूरंड लाइनजवळ अफगाणी सैनिकांनी पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केल्याचीही माहिती आहे.

अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार आल्यापासून दोन्ही देशांत तणावाची परिस्थिती वारंवार उद्भवत आहे. अफगाणिस्तानात तालिबान शासन येण्यात पाकिस्तानचाही हातभार होता. परंतु, तालिबानी सरकार आल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याऐवजी अधिकच बिघडले होते.

सध्याच्या परिस्थितीत तालिबान सरकार भारत आणि पाश्चिमात्य देशांत संबंध सुधारण्यावर भर देत आहे. यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानला वाटते क तालिबानने त्याच्या इशाऱ्यावर काम करावे मात्र तालिबान सरकारने यास नकार देत स्वतःचे धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. तालिबान सरकारच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे की पाकिस्तानी विमानांनी आमच्या हद्दीत हवाई हल्ले केले. या हल्ल्यात आमच्या 8 सैनिकांचा मृत्यू झाला. मयतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. पाकिस्तानी सैन्याने हे हवाई हल्ले अफगाणिस्तानच्या खोस्त आणि पक्तिका प्रांतात केले आहेत.

Amit Shah : POK भारताचा, तिथले लोकही आपलेच; अमित शाहांनी पाकिस्तानला ठणकावलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज