Taliban Attack : इराणनंतर तालिबान! अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानी सैन्यावर हल्ला; तणाव वाढला

Taliban Attack : इराणनंतर तालिबान! अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानी सैन्यावर हल्ला; तणाव वाढला

Taliban Attack on Pakistan : पाकिस्तान आणि इराण यांच्यात चकमकी घडत असतानाच पाकिस्तानला (Taliban Attack on Pakistan) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानतील तालिबानी सैन्याने पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला केला आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि तालिबान यांच्या सैन्यात सीमा भागात भीषण चकमक झाल्याची माहिती आहे. कुनार-बाजौर या भागात हा गोळीबार सुरू आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे पाकिस्तानला आणखी एका आघाडीवर लढावे लागत आहे. अफगाणिस्तानात तालिबानी सत्तेत आल्यापासून दोन्ही देशांच्या हद्दीवर सतत संघर्ष सुरू असतो. या घडामोडींनतर पाकिस्तानी सैन्य अलर्ट मोडवर आहे. इराण पाकिस्तान सीमा अशांत असतानाच आता अफगाणिस्तानच्या सीमेवरही संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.

Pakistan Hits Iran : पाकिस्तानचा पलटवार! इराणमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज