Taliban government : यूएस-नाटो लष्करी तळांना विशेष आर्थिक झोनमध्ये रूपांतरित करणार

Taliban government : यूएस-नाटो लष्करी तळांना विशेष आर्थिक झोनमध्ये रूपांतरित करणार

काबूल : तालिबानने (Taliban government) अफगाणिस्तानातील (Afghanistan) यूएस आणि नाटो लष्करी तळांना विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यवाहक उपपंतप्रधानांनी रविवारी सांगितले की, तालिबान प्रशासन यूएस आणि नाटो लष्करी तळांना व्यवसायांसाठी विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये बदलण्याच्या योजनेवर काम करत आहे.

कार्यवाहक उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक समिती आणि मंत्रिमंडळाने यूएस लष्करी तळांना विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये बदलण्याचा प्रस्ताव सादर केला. याबाबत मुल्ला बरादार म्हणाले की, या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने परकीय सैन्याच्या लष्करी तळांवर हळूहळू विशेष आर्थिक झोनमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला.

Pankaja Munde : पिंपरी-चिंचवडचा ‘शास्तिकर’ लक्ष्मण जगतापांनी माफ केला

या तळांचे विशेष आर्थिक झोनमध्ये रूपांतर करण्यासाठी राजधानी काबूल आणि उत्तर बाल्ख प्रांतात एक पायलट योजना सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढं म्हणाले की, अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था कठीण काळातून जात आहे. 2021 मध्ये अमेरिकन सैनिक 20 वर्षांनी येथून परतले होते. तेव्हापासून मदत संस्था गंभीर मानवतावादी संकटाची भीती व्यक्त करत आहेत.

तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर पाश्चात्य देशांनी अफगाणिस्तानला दिल्या जाणाऱ्या विकास निधीत कपात केली आहे. शिवाय, परदेशात असलेली मालमत्ताही गोठवण्यात आली आणि बँकिंग क्षेत्रावर निर्बंध घालण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube