इराणनंतर नेक्स्ट टार्गेट कोण? ट्रम्पने सांगितलं ‘या’ देशाचे नाव    

Donald Trump On Cuba : अमेरिकेने 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हवाई हल्ला करत युद्धाची सुरुवात केली आहे. या युद्धाचा आज सहावा दिवस असून

Donald Trump On Cuba

Donald Trump On Cuba : अमेरिकेने 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हवाई हल्ला करत युद्धाची सुरुवात केली आहे. या युद्धाचा आज सहावा दिवस असून दोन्ही देश हल्ले- प्रतिहल्ले करताना दिसत आहे. केवळ अमेरिका आणि इराणलाच नाही तर या युद्धाचा फटका संपूर्ण देशाला बसताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता इराणनंतर आणखी एका देशावर अमेरिका टार्गेट करणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनंतर संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.

माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) म्हणाले की, इराणसोबत (Iran) सुरु असलेला वाद संपल्यानंतर क्युबाला (Cuba) टार्गेट करणार असून त्यांच्या समस्या सोडवणार असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

माध्यमांशी बोलताना ट्रम्प (Donald Trump On Cuba) म्हणाले की, इराणशी वाटाघाटी सुरू असताना क्युबाशी चर्चा सुरू होती. सुरुवातीला, क्युबाशी एकट्याने व्यवहार करण्याची योजना होती, परंतु इराणने अशी परिस्थिती निर्माण केली की त्यांना प्रथम त्यावर हल्ला करावा लागला. हवाना वॉशिंग्टनशी वाटाघाटी करू इच्छित आहे आणि व्यापार करारासाठी उत्सुक आहे, परंतु आता ते इराणनंतर क्युबाकडे पाहतील. त्यामुळे, क्युबाशी चर्चा देखील लांबणीवर पडली आहे.

इराण युद्धावर ट्रम्प काय म्हणाले?

तर दुसरीकडे यावेळी ट्रम्प यांनी इराण युद्धावर देखील भाष्य केले. माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेचे सैन्य, आमच्या हुशार इस्रायली मित्रांसह, वेळापत्रकापूर्वीच शत्रूचा पूर्णपणे नाश करत आहे. इराणची लष्करी क्षमता लक्षणीयरीत्या कमकुवत झाली आहे. त्यांच्याकडे हवाई दल किंवा हवाई संरक्षण प्रणाली नाही. इराणचे नौदल उद्ध्वस्त झाले आहे आणि अमेरिकेने तीन दिवसांत 24 जहाजे उद्ध्वस्त केली आहेत असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

पुढील 30 दिवसांसाठी रशियन तेल खरेदी करा; अमेरिकेने दिली भारताला सूट

 इराण तडजोड करण्यास तयार

पुढे बोलताना ट्रम्प यांनी मोठा दावा करत  इराण तडजोड करण्यास तयार आहे असं म्हटलं आहे. ट्रम्प म्हणाले की, ते फोन करत आहेत, ते विचारत आहेत, ‘आपण करार कसा करायचा? मी म्हणालो, ‘तुम्ही थोडा जास्त वेळ घेत आहात आणि आम्हाला आतापेक्षा त्यांच्याशी जास्त लढायचे आहे.  जे सहकार्य करतात ते एक नवीन आणि चांगले इराण घडवण्यास मदत करू शकतात, ज्यामध्ये प्रचंड क्षमता आहे.

follow us