आखातानंतर हिंदी महासागरात युद्धाचा भडका : अमेरिकेने श्रीलंकेत इराणची युद्धनौका बुडवली; 87 नौसैनिक ठार
America sinks Iranian warship अमेरिकेच्या श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळ इराणची महत्त्वाची युद्धनौका 'IRIS Dena' वर टॉरपेडो बुडवली
War erupts in the Indian Ocean After the Gulf America sinks In Sri Lanka Iranian warship : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता आशियाई देशांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. 4 मार्च 2026 अमेरिकेच्या एका अण्वस्त्रसज्ज पाणबुडीने श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळ इराणची महत्त्वाची युद्धनौका ‘IRIS Dena’ वर टॉरपेडो हल्ला करून ती बुडवली. या भीषण हल्ल्यात इराणचे किमान 87 नौसैनिक ठार झाले असून, ही घटना दुसऱ्या महायुद्धानंतरची अशा प्रकारची पहिलीच लष्करी कारवाई मानली जात आहे.
नेमकी घटना काय?
श्रीलंकेच्या गाले (Galle) बंदरापासून सुमारे 40 नॉटिकल मैल (75किमी) अंतरावर आंतरराष्ट्रीय पाण्यामध्ये ही घटना घडली. पहाटे 5: 30 च्या सुमारास ‘IRIS Dena’ या जहाजावरून धोक्याचे संदेश (Distress Call) प्राप्त झाले. अमेरिकन संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी पेंटागॉनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुष्टी केली की, “एका अमेरिकन पाणबुडीने इराणच्या या युद्धनौकेला लक्ष्य केले. ज्या जहाजाला वाटत होते की ते आंतरराष्ट्रीय पाण्यात सुरक्षित आहे, त्याला टॉरपेडोने जलसमाधी दिली आहे.”
शेतकरी कर्जमाफीबाबत दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा! 30 जूनपूर्वी निर्णय घेतला जाणार
भारताशी असलेले कनेक्शन
विशेष म्हणजे, ही युद्धनौका फेब्रुवारी 2026 मध्ये भारतात विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या ‘मिलन 2026’ (MILAN 2026) या बहुराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झाली होती. हा सराव संपवून आपल्या मायदेशी परतत असतानाच अमेरिकेने तिला वाटेत गाठून नष्ट केले. भारताच्या शेजारील देशाच्या सीमेजवळ ही घटना घडल्याने भारतीय संरक्षण क्षेत्रातही चिंतेचे वातावरण आहे.
बचावकार्य आणि हानी
* मृत्यू: श्रीलंकेच्या नौदलाने आतापर्यंत 87 मृतदेह बाहेर काढले आहेत.
* बचाव: 32 जखमी नौसैनिकांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले असून त्यांना गाले येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
* बेपत्ता: जहाजावर सुमारे 180 कर्मचारी होते, त्यापैकी 60 हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत.युद्धाची भीषणता वाढली.
गेल्या पाच दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) अंतर्गत मोठे हवाई हल्ले सुरू केले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचाही या संघर्षात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इराणचे संपूर्ण नौदल नष्ट करणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट असल्याचे पेंटागॉनने स्पष्ट केले आहे.
राज्यात बस, ट्रक, टॅक्सी आणि ऑटो ठप्प! ई-चलन विरोधात वाहतूकदार संघटना आज संपावर
जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम
हिंदी महासागरातील या हल्ल्यामुळे जागतिक सागरी व्यापारी मार्गावर भीतीचे सावट पसरले आहे. इराणने प्रत्युत्तर म्हणून ‘होरमुझची सामुद्रधुनी’ बंद केल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, याचा थेट फटका भारतासह अनेक देशांना बसू शकतो.
