शेतकरी कर्जमाफीबाबत दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा! 30 जूनपूर्वी निर्णय घेतला जाणार
Dattatreya Bharane यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठी माहिती दिली
Dattatreya Bharane’s big announcement regarding farmer loan waiver Decision taken before June 30 : गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांचं नैसर्गिक आपत्तींमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना आणि नेत्यांकडून सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली जात आहे. त्यामध्ये शेतकरी संघटनांनी आंदोलन देखील केले आहे. त्यानंतर सरकारने 30 जूनपुर्वी कर्जमाफीचं अश्वासन दिलं होतं. त्यावर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिली.
नेमकं काय म्हणाले कृषीमंत्री दत्तात्रय भरणे?
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, या सरकारमधील आमदार मंत्र्यांसह सर्वजण शेतकऱ्यांची मुलं आणि शेतकरी आहेत. त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींमुळे अर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक बैठक घेतली होती.
राज्यात बस, ट्रक, टॅक्सी आणि ऑटो ठप्प! ई-चलन विरोधात वाहतूकदार संघटना आज संपावर
त्यामध्ये त्यांनी प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे. या समितीला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या कर्जमाफीच्या गाईडलाईन आणि निकष सादर करण्याची मुदत दिलेली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा केली जाईल. त्यानंतर 30 जूनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. कारण शेतकऱ्यांचं वर्ष हे 30 जूननंतर सुरू होतं. असं म्हणत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत मोठी माहिती दिली.
