Amit Shah : “POK भारताचा, तिथले लोकही आपलेच”; अमित शाहांनी पाकिस्तानला ठणकावलं
Amit Shah on Pak Occupied Kashmir : पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे असे भाजप नेते नेहमीच (POK) ठणकावून सांगत असतात. आताही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे. तिथे राहणारे लोकही आपलेच आहेत असे पाकिस्तानला (Pakistan) ठणकावून सांगितले आहे. अमित शाह यांचं वक्तव्य म्हणजे काश्मीरचे रडगाणे गाणाऱ्या पाकिस्तानाल रोखठोक इशाराच असल्याचे मानले जात आहे. गृहमंत्री अमित शाह काल एका हिंदी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी सीएए कायद्याला (CAA) विरोध करणाऱ्या नेत्यांवरही घणाघाती टीका केली.
"PoK is part of India, Hindus and Muslims living there are our own": Amit Shah
Read @ANI Story | https://t.co/suxDNI2MZj#AmitShah #PoK #India pic.twitter.com/obFLbaIfTS
— ANI Digital (@ani_digital) March 15, 2024
शाह पुढे म्हणाले, आम्ही कधीच फाळणीच्या बाजूने नव्हतो. जर आम्ही निर्णय घेण्याच्या स्थितीत असतो तर देशाची फाळणी कधीच होऊ दिली नसती. पाकिस्तानात अल्पसंख्यांक समाजावर अन्याय झाल्याचे वाटत होते त्यांनी फाळणीच्या वेळी आश्वासन देण्यात आले होते की ते कधीही भारतात येऊ शकतात. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारताचेच आहे. तेथील नागरिकहीही आपलेच आहेत.
मोठे निर्णय एक किंवा दोघांसाठी घेतले जात नाहीत. ज्यावेळी एखादे धोरण तयार केले जाते त्यावेळी ते एखाद्या मोठ्या समस्येचे निवारण करण्यासाठीच केले जाते, असेही अमित शाह म्हणाले. दिल्लीत शरणार्थी म्हणून आलेल्या लोकांकडे पाहून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले होते की आता येथे चोऱ्यांचे प्रमाण वाढेल. यावर अमित शाह यांनी केजरीवालांना चांगलेच फैलावर घेतले.
31 डिसेंबर 2014 पर्यंत जे शरणार्थी भारतात आले आहेत त्यांच्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे. या लोकांना पाकिटमार म्हणणे योग्य नाही. देशात किती रोहिंग्या घुसखोर आले आहेत त्यांच्यावर केजरीवाल का काही बोलत नाहीत असा सवाल अमित शाह यांनी केला.
Amit Shah : उद्धव ठाकरेंचं स्वागत करणार का? अमित शाहांचं एकाच वाक्यात उत्तर