नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड पण पहिल्याच वर्षात मोठे आव्हान, ‘या’ राज्यांमध्ये होणार निवडणुका
Nitin Nabin : पाच वेळा आमदार असणारे नितीन नबीन यांची आज बिनविरोध भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. नितीन नबीन देशातील सर्वात
Nitin Nabin : पाच वेळा आमदार असणारे नितीन नबीन यांची आज बिनविरोध भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. नितीन नबीन देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहे. तर दुसरीकडे नितीन नबीन यांच्या त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षी मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. यावर्षी पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून भाजप आसाम वगळता कोणत्याही राज्यात सत्तेत आलेला नाही.
नितीन नबीन (Nitin Nabin) यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाची अधिकृत घोषणा आज मंगळवारी दिल्लीतील भाजप (BJP) मुख्यालयात झाली असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. नितीन नबीन यांची भाजपचे 12 वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीसह, ते केवळ 45 वर्षांच्या वयात पक्षाचे हे सर्वोच्च पद भूषवणारे सर्वात तरुण नेते ठरले.
काल दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत झालेल्या नामांकन प्रक्रियेत नितीन नबीन यांच्या बाजूने एकूण 37 नामांकन अर्ज दाखल झाले. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या मुख्य प्रस्तावकांमध्ये होते.
नबीन यांचे सुरुवातीचे आव्हान
पक्षप्रमुख म्हणून नबीन यांना सुरुवातीपासूनच अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल, ज्यामध्ये पश्चिम बंगाल व्यतिरिक्त केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि आसाम यासारख्या राज्यांमधील निवडणुकांचा समावेश आहे. भाजप आसाम वगळता या राज्यांमध्ये स्वतःच्या बळावर सत्तेत येऊ शकलेला नाही. तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये, पक्ष मागील निवडणुकांपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच नबीन यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंचायत ते संसदेपर्यंत भाजपचे अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाचा उल्लेख करत पक्षाचे ध्येय निवडणुका जिंकणे नसून लोकांच्या दैनंदिन चिंतांशी खोलवर जोडलेले राहणे हे असले पाहिजे असं सांगितले आहे.
शहा-नड्डा यांच्या यशाचे रक्षण करण्याची जबाबदारी
तर दुसरीकडे नितीन नबीन यांच्यावर आता भाजपची तळागाळातील उपस्थिती टिकवून ठेवण्याचे आव्हान देखील असणार आहे. याचा मुख्य कारण म्हणजे देशातील अनेक ठिकाणी भाजप गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत आहे. त्यामुळेत तळागाळातील कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांना आणखी प्रयत्न करावी लागणार आहे. तसेच अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे कार्य यशस्वीरित्या पुढे नेण्याचे आव्हान देखील त्यांच्यासमोर असणार आहे.
2014 पासून केंद्रात भाजप सत्तेत असून अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी पक्षप्रमुख म्हणून पक्षाला नवीन उंचीवर नेले आहे मात्र आता दोन्ही नेते केंद्रात केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्या दोन्ही पूर्वसुरींच्या सावलीपासून दूर जाणे, स्वतःची ओळख निर्माण करणे आणि त्यांचा यशाचा दर टिकवून ठेवणे ही जबाबदारी नितीन नबीनवर आहे.
कोण आहे नितीन नबीन?
नबीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र नितीन नबीन यांनी 2006 मध्ये वडिलांच्या निधनानंतर राजकारणात प्रवेश केला आणि पाटणा पश्चिम मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकली, ज्या मतदारसंघातून त्यांचे वडीलही विजयी झाले होते. नंतर या जागेचे नाव बदलण्यात आले आणि 2010 पासून ते बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नव्याने निर्माण झालेल्या बंकीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2010, 2015, 2020 आणि 2025 मध्ये सलग चार निवडणुका जिंकत आहेत.
Sameer Gaikwad Death : गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा मृत्यू; कारण काय?
नबीन यांना बिहारमध्ये बराच अनुभव आहे. गेल्या काही वर्षांत, त्यांनी बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये रस्ते बांधकाम, शहरी विकास आणि गृहनिर्माण आणि कायदा आणि न्याय यासह अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये मंत्रीपदे भूषवली आहेत. पक्षाच्या बाबतीत, त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) चे बिहार राज्य अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी इतर राज्यांमध्ये संघटनात्मक जबाबदाऱ्या देखील सांभाळल्या आहेत आणि या काळात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना पक्षात एक उगवता राष्ट्रीय पातळीचा नेता म्हणून स्थापित केले आहे.
