Pakistan News : पाकिस्तानात इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज; अनेकांना अटक

Pakistan News : पाकिस्तानात इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज; अनेकांना अटक

Pakistan News : पाकिस्तानात निवडणुका होऊन वीस दिवस उलटून गेल्यानंतर अखेर आज नवीन (Pakistan News) पंतप्रधान मिळणार आहे. यामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण असताना एका घटनेमुळे तणावाची स्थिती निर्माण झाला आहे. इम्रान खान यांच्या (Imran Khan) पीटीआय पक्षाचे समर्थन असलेल्या नेत्यांकडून विरोध प्रदर्शने अजूनही सुरू (Pakistan Elections) आहेत. निवडणूक निकालाविरुद्ध ही निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार जीपीओ चौक परिसरात आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सरकार स्थापन होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी पीटीआयचे कार्यकर्ते जीपीओ चौकात आंदोलन करत होते. या आंदोलनासाठी लोकांची गर्दी वाढू लागल्याने पोलिसांना हस्तक्षेप करत आंदोलकांना अटक करावी लागली. आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर या परिसरात आधीच पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते.

Pakistan : अखेर तिढा सुटला! पाकिस्तानात ‘पीपीपी’-‘पीएमएल-एन’चे सरकार; शहबाज शरीफ होणार PM

यानंतर येथे लोकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. लोकांची वाढत असलेल्या संख्येमुळे परिस्थिती कदाचित हाताबाहेर जाईल याचा अंदाज आल्याने पोलिसांनी या लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या दरम्यान गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागल्याची माहिती आहे.

दरम्यान, आज पीएमएल-एन पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ पंतप्रधान (Shehbaz Sharif) पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी संसदेच्या सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्र्यांची निवड करण्यासाठी संसदेत आज (रविवार) मतदान होणार आहे. जर या पदासाठी शाहबाज यांची निवड करण्यात आली तर पाकिस्तानच्या इतिहासात 33 वे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ शपथ घेतील. या प्रक्रियेला अजून वेळ आहे. यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्रपती पदासाठीही निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Pakistan : घोषणा नाही, कारणही नाही तरीही ‘एक्स’ ठप्प; पाकिस्तानात सात दिवसांपासून चाललंय काय?

निवडणुकीत मोठ्या घोटाळ्याचा आरोप 

दरम्यान, याआधी रावळपिंडीचे माजी आयुक्त लियाकत चठ्ठा यांनी शहरातील निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांना विजयी केले गेले असा आरोप केला होता. रावळपिंडीत 13 उमेदवारांना जबरदस्तीने विजयी घोषित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाने 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हेराफेरी आणि पक्षाला दिलेला जनादेश हिसकावून घेण्याच्या विरोधात देशव्यापी निदर्शने सुरू केली असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. निवडणुकीतील फसवणुकीचे आरोप मात्र फेटाळून लावण्यात आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube