पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या हत्येच्या बातमीबाबत तुरुंग प्रशासनाचा खुलासा
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या हत्येच्या बातम्यांबाबत आदियाला तुरुंग प्रशासनाने तोडली चुप्पी.
Pak ex pm death? : भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात असणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात हत्या केली असल्याची बातमी अफगाण टाइम्सने प्रसारित केली होती. याच बातमीचा हवाला देत बलुचिस्तान (Baluchistan) परराष्ट्र मंत्रालयाकडून देखील इमरान खान (Imran Khan) यांची हत्या गुप्तचर संस्था आणि असीम मुनीर यांनी यांच्याकडून केली गेली असल्याचा दावा करण्यात आला होता. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इमरान खान समर्थक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आदियाला तुरुंगाबाहेर गर्दी केली होती. मात्र आता जेल प्रशासनाने यावरची चुप्पी तोडली आहे. त्यांनी मीडियात आलेल्या बातम्यांना खोडून काढलय. यातच आदियाला तुरुंगामधील अधिकाऱ्यांचं स्टेटमेंट देखील समोर आलंय. त्यांचं म्हणणं आहे की माजी पंतप्रधान इमरान खान हे पूर्णपणे सुरक्षित आहेत. तसेच इम्रान खान यांना आदियाला तुरुंगात चांगल्या पद्धतीने ठेवले असल्याचं ख्वाजा असिफ यांनी सांगितलंय.
त्यांनी हे देखील सांगितलंय की त्यांना तुरुंगात फाईव्ह स्टार ट्रीटमेंट दिली जातेय. त्याचप्रमाणे त्यांचं स्वास्थ्य (Health) देखील उत्तम असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यांना तुरुंगात सगळ्या सुविधा दिल्या जात असल्याचं तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं. त्यांचं आरोग्य देखील उत्तम असल्याचं ख्वाजा असिफ यांनी सांगितलं. दरम्यान अफगाण टाइम्सच्या वृत्तानंतर PTI कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने आदियाला तुरुंगाबाहेर जमले आहेत. त्यांचे कुटुंबीय तुरुंगाबाहेर धरणे आंदोलनावर बसले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला इमरान खान यांना भेटून द्या. मात्र तुरुंग प्रशासन त्यांना भेटू देत नाहीये.
