अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Delhi High Court On Ajay Devgn Deepfake Video : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला टार्गेट करण्यासाठी त्याचा एक डीपफेक व्हिडिओ

  • Written By: Published:
Delhi High Court On Ajay Devgn Deepfake Video

Delhi High Court On Ajay Devgn Deepfake Video : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला टार्गेट करण्यासाठी त्याचा एक डीपफेक व्हिडिओ गेल्याकाही दिवसांपासून व्हायरल करण्यात येत आहे. या प्रकरणात आता दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी करताना डीपफेक व्हिडिओ आणि अश्लील एआय जनरेटेड कंटेंट तात्काळ डिलीट करण्याचे आदेश दिले आहे. तसेच व्हिडिओबाबत YouTube शी संपर्क साधला होता का? असा प्रश्न देखील अभिनेता अजय देवगणला विचारला.

तात्काळ कारवाई करा

या प्रकरणात सुनावणी करताना न्यायमूर्ती मनित प्रीतम सिंह अरोरा यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात न्यायालय फक्त अश्लील आणि डीपफेक कंटेंटवर कारवाई करण्याच आदेश देत आहे मात्र फॅन पेजवरील सामन्य फोटो किंवा पोस्ट डिलीट करण्याचे आदेश देणार नाही.

बार अँड बेंचच्या अहवालानुसार, न्यायाधीश अरोरा यांनी टिप्पणी केली की, चाहत्यांना सामन्य फोटो पोस्ट करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे अन्यथा सर्व फॅन पेज डिलीट करावे लागतील. साध्या फोटो रिप्रोडक्शनवर एकतर्फी कारवाई शक्य नाही पण डीपफेक (Ajay Devgn Deepfake) , अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकण्याचे आदेश दिले जाऊ शकते.

युट्यूबरवर गंभीर आरोप

तर दुसरीकडे या प्रकरणात अजय देवगण यांचे वकील प्रवीण आनंद यांनी युट्यूबर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी सांगितले की, एक युट्यूबर अभिनेत्याचे नाव, फोटो आणि चेहरा वापरून अश्लील, आक्षेपार्ह आणि एआय-जनरेटेड डीपफेक कंटेंट पसरवत आहे. अमेझॉनसह अनेक ऑनलाइन मार्केटप्लेसवर अजय देवगणचे नाव आणि फोटो असलेले पोस्टर्स, टी-शर्ट आणि कॅप्स परवानगीशिवाय विकले जात आहेत. डीपफेकचा मुद्दा जागतिक चिंतेचा विषय आहे आणि अनेक देश या मुद्द्यावर भारतीय न्यायालयाच्या निर्णयांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

 तक्रार दाखल केली होती का?  न्यायालयाचा प्रश्न

सुनावणीदरम्यान, न्यायालयाने विचारले की, अभिनेत्याने थेट युट्यूबशी संपर्क साधून प्रथम तक्रार दाखल केली होती का? औपचारिक निषेधाने खटला मजबूत झाला असता. न्यायाधीश अरोरा म्हणाले, मी आता दिलासा देत आहे, परंतु भविष्यात अशा प्रकरणांमध्ये पूर्व तक्रार अनिवार्य असेल. अन्यथा, पुढील सुनावणीपर्यंत दोन महिने वाट पाहावी लागेल. याचिकेत कॉपीराइट उल्लंघन, ट्रेडमार्क अधिकार, डीपफेक, ऑनलाइन मार्केटिंग आणि पोर्नोग्राफिक कंटेंटचे एकत्रीकरण प्रकरण गुंतागुंतीचे करते. न्यायालयाने टिप्पणी केली की इतके वेगवेगळे मुद्दे एकत्र केल्याने न्यायालय आणि वकिल दोघांनाही अडचणी निर्माण होतील.

भाजप पदाधिकाऱ्याचं स्टिंग ऑपरेशन अन् कोकणात राणे बंधूंमध्ये जुंपली

अजय देवगणचा दावा काय?

अभिनेत्याने त्याच्या याचिकेत म्हटले आहे की त्याच्या चित्रपटांमधील क्लिप वापरून तयार केलेले डीपफेक व्हिडिओ त्याच्या नैतिक अधिकारांचे उल्लंघन करतात. ‘अजय देवगण’ हा त्याच्या नावाचा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे आणि त्याचा अनधिकृत वापर बेकायदेशीर आहे. अश्लील आणि असत्यापित डीपफेक व्हिडिओ त्याची प्रतिष्ठा कलंकित करतात.

follow us