दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चेक बाउंस प्रकरणात अखेर राजपाल यादवचं तिहार तुरुंगात आत्मसमर्पण

राजपाल यादव यांनी अखेर आत्मसमर्पण केले आहे. राजपाल यादव पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात हजर झाला आणि न्यायालयाकडे दिलासाची मागणी केली.

  • Written By: Published:
Untitled Design (382)

Rajpal Yadav surrenders in Tihar Jail : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, राजपाल यादव यांनी अखेर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पणानंतर राजपाल यादव पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात हजर झाला आणि न्यायालयाकडे दिलासाची मागणी केली. यावेळी त्याने न्यायालयाला सांगितले की, तो 25 लाख रुपये घेऊन आला असून उर्वरित रक्कमही लवकरात लवकर भरण्यास तयार आहे. मात्र, न्यायालयाने त्याला चांगलेच फटकारले.

न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणताही दिलासा देण्याआधी आत्मसमर्पण करणे आवश्यक आहे. आत्मसमर्पण झाल्यानंतरच न्यायालय दिलासाबाबत विचार करेल, असेही स्पष्ट करण्यात आले. उच्च न्यायालयाने नमूद केले की, राजपाल यादवला यापूर्वी वारंवार दिलेला दिलासा हा प्रकरण सौहार्दपूर्ण मार्गाने मिटेल आणि तक्रारदार कंपनीची थकबाकी भरली जाईल, या आश्वासनावर आधारित होता. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. न्यायालयानुसार, अद्यापही सुमारे 9 कोटी रुपयांची थकबाकी बाकी आहे.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना बुधवारी दुपारी 4 वाजेपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यांनी त्या दिवशी आत्मसमर्पण केले नाही. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी गुरुवारी आत्मसमर्पण केले. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने कठोर भूमिका घेत सांगितले की, तुम्ही मुंबईत असल्याचे सांगितले होते, म्हणून आत्मसमर्पणासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली. आता कोणताही आधार शिल्लक राहिलेला नाही. उदारता दाखवण्याचे कोणतेही कारण उरलेले नाही.

अजितदादांच्या अपघाताबद्दल शरद पवारांच्या खासदाराला वेगळीच शंका, काय म्हणाले बजरंग सोनवणे?

दरम्यान, चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करणारी राजपाल यादव यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, ही याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली होती आणि आत्मसमर्पणासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. राजपाल यादव यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, एका आठवड्याची मुदत मिळाल्यास ते संपूर्ण रक्कम भरण्यास तयार आहेत. त्यांनी 50 लाख रुपयांची व्यवस्था केली असून त्याचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत. मात्र, न्यायालयाने ही मागणी मान्य केली नाही.

उल्लेखनीय बाब म्हणजे, राजपाल यादव यांनी यापूर्वी एकूण 2.5 कोटी रुपये भरण्याचे आश्वासन दिले होते, ज्यामध्ये 40 लाख रुपये आणि 2.10 कोटी रुपयांचा हप्ता समाविष्ट होता. मात्र, अंतिम मुदत उलटूनही ही रक्कम जमा करण्यात आली नाही. दरम्यान, राजपाल यादवच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘भूत बांगला’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. या दोन्ही चित्रपटांचे शूटिंग सध्या सुरू आहे.

follow us