“पुढील दोन दिवसांत सोनम वांगचूक यांचा जीव जाऊ शकतो” हायकोर्टात केली वैद्यकीय मदतीची याचिका दाखल!
सोनम वांगचूक यांना रुग्णालयात नेऊन लिक्विड डाएट सक्तीने द्यावा. अन्यथा पुढील दोन दिवसांत त्यांचा जीव जाऊ शकतो. दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल
Sonam Wangchuk on hunger strike, petition filed in High Court for medical assistance:कॉक्रोच जनता पार्टीने(CJP) नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर दिल्ली येथील जंतर मंतर(Jantar Mantar) याठिकाणी उभा केलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतोय. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipake) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) हे बेमुदत उपोषणाला (hunger strike) बसले आहेत. त्यांचा उपोषणाचा आजचा 18 वा दिवस आहे.
सोनम वांगचूक बेमुदत उपोषणाला बसले असल्याने त्यांचे जवळपास साडे आठ किलो वजन कमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांनी हे उपोषण सोडून त्यांना सक्तीचे अन्न देणे आणि वैद्यकीय मदत पुरवणे अशी मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) दाखल करण्यात आली आहे. वकील राकेश सैनी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. सोनम वांगचूक यांनी त्यांचे उपोषण असेच सुरु ठेवल्यास त्यांचा पुढील दोन दिवसांत जीव जाऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांनी वांगचूक यांना रुग्णालयात नेऊन सक्तीने अन्न भरवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.
CJP Protest : ‘कॉकरोच जनता पार्टी’ चे आंदोलन सुरु; जंतर-मंतरवर आंदोलनासाठी नियम काय?
जर सोनम वांगचूक यांचे निधन झाले तर ती देशासाठी आणि जगासाठी मोठी लाजीरवाणी बाब ठरेल. त्यांना रुग्णालयात नेऊन लिक्विड डाएट सक्तीने द्यावा. असेही याचिकेत म्हटले आहे. तसेच सरकार वांगचूक यांच्यासोबत एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे, देशद्रोह्याप्रणाणे वागत आहे, त्यांच्या उपोषणावर सरकारने एक भ्र शब्दही काढला नाही. असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.
विशेष विश्लेषण : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ भारतात नेपाळ-बांग्लादेश सारखी क्रांती घडवू शकेल का?
दरम्यान सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला विरोधी पक्षाचे नेते, चित्रपटसृष्टीतील लोकं आणि भारतातील तरुण यांचा मोठा पाठींबा मिळाला आहे. तसेच महाराष्ट्रातून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी वांगचूक यांना आपला पाठींबा दर्शवला आहे.