‘मी ठीक आहे’ म्हणणाऱ्या पुण्याच्या हेरंब यांचा काही तासांतच होर्मूझमधील हल्ल्यात मृत्यू; कुटुंबीयांना मोठा धक्का

यूएईशी संबंधित जहाजांवर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील एका तरुण भारतीय अभियंत्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 39

Pune youth dies in Hormuz : मध्यपूर्वेतील होर्मूझच्या समुद्रधुनीत पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून समुद्री मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर यूएईशी संबंधित जहाजांवर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील एका तरुण भारतीय अभियंत्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यासह दमपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये थर्ड इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. ते एमव्ही जीएफएस गॅलॅक्सी या कंटेनर जहाजावर सेवा बजावत होते. रविवारी पहाटे सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे जहाज ओमानच्या सागरी हद्दीतून प्रवास करत असताना त्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये एकाच खळबळ उडाली.

हल्ल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जहाजावरील एकूण 24 कर्मचाऱ्यांपैकी 23 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. मात्र हेरंब करमरकर यांना वाचवता आले नाही. या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे. हेरंब यांच्या मृत्यूची बाब अधिक वेदनादायी ठरली आहे. कारण हल्ल्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवर संवाद साधला होता. रात्री 2 वाजून 50 मिनिटांनी कुटुंबीयांशी त्यांचे शेवटचे संभाषण झाले होते. त्यानंतर काही वेळातच जहाजावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. मंगळवारी त्यांच्या नातेवाईक रविंद्र टंडन यांना अधिकृतपणे या दुर्घटनेची माहिती देण्यात आली. ही बातमी समजताच करमरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

एसटी महामंडळाची 13.50 टक्के भाडेवाढीची तयारी, डिझेल, टायर आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव खर्चाचा परिणाम

हेरंब करमरकर हे आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने मर्चंट नेव्हीमध्ये यशस्वी कारकीर्द घडवत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवार, सहकारी आणि नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. सामाजिक माध्यमांवरही अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, हेरंब करमरकर यांचा मृतदेह सध्या ओमान प्रशासनाच्या ताब्यात असल्याची माहिती मिळत आहे. आवश्यक वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह संबंधित जहाज कंपनीच्या ताब्यात दिला जाईल. पुढील प्रक्रिया पूर्ण करून पार्थिव पुण्यात आणण्यात येणार असून त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या सागरी व्यापार मार्गांपैकी एक मानली जाते. या भागात वाढत असलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय जहाजवाहतूक, व्यापारी जहाजांची सुरक्षा आणि तेथे कार्यरत हजारो खलाशी यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत एका भारतीय तरुण अभियंत्याचा झालेला मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी असून या घटनेमुळे समुद्री सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुण्याच्या हेरंब करमरकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण समाजात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

follow us