अवघ्या बॉलिवूडला ‘देवमाणूस’ची भुरळ, ‘सिंघम’ अजय देवगणने दिल्या हटके शुभेच्छा..

अवघ्या बॉलिवूडला ‘देवमाणूस’ची भुरळ, ‘सिंघम’ अजय देवगणने दिल्या हटके शुभेच्छा..

Devmanus Marathi Movie : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतूनही या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणलाही या ट्रेलरने (Ajay Devgan) भुरळ घातली आहे. आपल्या सोशल मीडियावर ट्रेलर पोस्ट करत अजयने निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या मराठीतील पदार्पणाबद्दल अभिनंदन केले. ट्रेलर खूप उत्कंठावर्धक आहे, देवमाणसाची सटकली की काय होते…?, असे म्हणत संपूर्ण टीमला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राजकुमार राव, अर्जुन कपूर, सनी सिंग यानेही या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांच्या भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव… ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित! चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ट्रेलरमध्ये ‘देवमाणूस’च्या रहस्यपूर्ण, गूढ आणि भावनिक कथानकाची झलक पाहायला मिळते. दमदार अभिनय, दाट भावनांचा प्रवाह आणि उत्कंठा वाढवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असून ‘देवमाणूस’ मराठी प्रेक्षकांमध्ये जागतिक स्तरावर आपली छाप सोडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अधिक अर्थपूर्ण आणि आकर्षक चित्रपट देण्याचा आमचा निर्धार ‘देवमाणूस’मधून अधोरेखित होतो. लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’, लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित, हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्माते अंकुर गर्ग म्हणाले, देवमाणूस हा लव फिल्म्सच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तेजस देऊस्कर यांचे प्रभावी दिग्दर्शन, तसेच महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि संपूर्ण टीमच्या दमदार कामगिरीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकणार आहे.

पांडुरंग प्रेक्षकांच्या भेटीला! ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत

follow us
  • fb
  • instagram
  • youtube