Iran Israel War : युद्धाच्या झळा स्वयंपाक घरापर्यंत, सरकारचं काय चुकलं? पेट्रोल-डिझेलप्रमाणे एलपीजी स्टोअर का केला नाही?

Iran Israel War store LPG ज्या प्रमाणे पेट्रोल आणि डिझेलची साठवणुक करता येते त्या प्रमाणे एलपीजीची का नाही? चला तर जाणून घेऊ सविस्तर...

Iran Israel War reached kitchen Why didn't government store LPG like petrol and diesel

Iran Israel War reached kitchen Why didn’t government store LPG like petrol and diesel : युद्ध जरी इराण विरूद्ध इस्त्रायल अमेरिका यांच्यात सुरू असलं तरी अनेक देश वेठीस धरले गेले आहेत. भारतात इंधनापासून ते उद्योग, शेती, हॉटेल व्यवसाय अन् थेट स्वयंपाक घरातील एलपीजी गॅस या सर्वांना या युद्धाच्या झळा पोहचत आहेत. एकीकडे पेट्रोल डिझेलचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

देशात 1 एप्रिलपासून संपूर्ण कर गणित बदलणार, तुमच्यावर काय होणार परिणाम ?

दुसरीकडे स्वयंपाकासाठी वापरला जाणारा एलपीजी गॅसचा मात्र तुटवडा असल्याने सरकारकडून कमर्शिअल गॅस वितरण थांबवण्यात आलयं, घरगुती गॅसच्या बुकिंगचे दिवस वाढवण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना गॅस काटकसरीने वापराचे आवाहन केलं आहे. मात्र यामध्ये सर्वांनाच एक प्रश्न पडला असेल की, जर पेट्रोल-डिझेलचा साठा शिल्लक आहे तसा एलपीजीचा का नाही? किंवा ज्या प्रमाणे पेट्रोल आणि डिझेलची साठवणुक करता येते त्या प्रमाणे एलपीजीची का नाही? चला तर जाणून घेऊ सविस्तर…

भारतीयांना दिलासा! हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून दोन LPG टँकर्सना जाण्याची इराणने दिली परवानगी

ज्याप्रमाणे कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेल बनवलं जातं आणि त्याची साठवणूक करणे सोपं असतं ज्याला खड्डे खोदून देखील साठवलं जातं. शकता किंवा मोठ्या ड्रम्समध्ये आणि पाईपलाईन्समध्ये देखील हे इंधन स्टोअर केलं जातं. मात्र एलपीजी गॅसचं तसं नाही. हा गॅस स्टोअर करणं अत्यंत कठीण आणि महागडं आहे. कारण एलपीजी गॅसला एका विशिष्ट प्रेशरच्या माध्यमातून लिक्विड फॉर्ममध्येच स्टोअर करावा लागतो. यासाठी एका विशिष्ट पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. ज्यामध्ये प्रेशराईज्ड सिलेंडर, गोलाकार टँक, माउंटेड स्टोरेज बुलेट आणि जमिनीच्या खाली बनवण्यात आलेल्या गुहा यांचा समावेश आहे.

March 14 Horoscope : ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार?

हे सर्व बनवण्यासाठी अत्यंत खर्च येतो. यावर भारतामधील जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यात आलेली नाही. तर आत्तापर्यंत भारतात अशा प्रकारे एलपीजी साठवण्याचे केवळ दोनच साठे आहेत. ज्यामध्ये पहिली जागा आहे ती म्हणजे विशाखापट्टणम आणि दुसरी मंगळुरू या दोन्ही ठिकाणी अंडरग्राउंड गुहा आहेत. ज्यामध्ये एलपीजी साठवला जातो. जेणेकरून अशा प्रकारे एलपीजी न मिळण्याची परिस्थिती उद्भवल्यास देशाकडे साठा शिल्लक राहील.

तपास एका खुनाचा, उलगडा दुसऱ्या एका खुनाचा; सासऱ्याला संपविणाऱ्याने प्रेयसीला कसे संपविले ?

या गुहांना रॉक कॅवर्न्स म्हटलं जातं मंगरूळूमध्ये बनवण्यात आलेल्या एलपीजी कॅवर्नची क्षमता जवळपास 80 हजार टन आहे. तर विशाखापट्टणममधील कॅवर्नची क्षमता जवळपास 60 हजार टन आहे. म्हणजे भारतात केवळ 1.4 लाख टन गॅस स्टोअर करण्याची क्षमता आहे. देशातील दररोजच्या केसच्या मागणीच्या हिशोबाने पाहिलं तर हा साठा केवळ दोनच दिवस भारताला गॅस पुरवठा करू शकतो. त्यामुळे सध्या सरकारने कमर्शियल गॅस सिलेंडर देणे थांबवलं आहे. त्यामुळे सरकारकडून नागरिकांना केवळ दिलासा देण्यासाठी गॅस शिल्लक असल्याच्या विधानांवरून विरोधकांकडून टीका केली जात आहे.

‘इकडे बघ’ म्हणत जयराजेंची खुन्नस; जयराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील आमनेसामने

दुसरीकडे सरकारकडून मंगळूरूमध्ये सध्या असलेल्या कॅवर्न शिवाय आणखी कॅवर्न बनवण्याची तयारी सुरू आहे. गुजरात आणि ओडीसा येथील किनारपट्टीवर नवे कॅवर्न बनवण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. जेणेकरून आयात केलेला गॅस त्या ठिकाणी स्टोअर केला जाईल. हे सर्व होईल तेव्हा होईल मात्र गॅस संकट सध्या संपूर्ण देशावर घोंगावत आहे एवढं नक्की.

यश राज फिल्म्सने ‘अल्फा’च्या थिएटर रिलीजची तारीख जाहीर; 10 जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित होणार

त्यानंतर देशभरात इंडियन ऑइल, एचपी आणि बीपीसीएल यासारख्या गॅस कंपन्यांकडे 200 हून अधिक एलपीजी बॉटलिंग प्लांट्स आहेत.
ज्यामध्ये व्हिर्टीकल आणि हॉरीझॉन्टल टँक असतात. त्यांना बुलेट देखील म्हटले जाते. भारतातील सर्वात जास्त एलपीजी साठा याच बुलेट्समध्ये स्टोअर केला जातो. याशिवाय ज्या रिफायनरीमध्ये एलपीजी गॅस बनवला जातो. त्याठिकाणी देखील स्टोरेज टँक असतात. त्यामध्ये रिफायनरीमधून काढून बॉटलिंग प्लांटपर्यंत हा गॅस ट्रक्स किंवा इतर मार्गाने पाठवला जातो.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’चित्रपट येणार मराठी ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीला !

सध्या देशात असलेल्या गॅस साठ्यांपैकी या बॉटलिंग प्लांटमध्ये देखील काही साठा शिल्लक आहे. त्याचबरोबर एलपीजी पाईपलाईन्समध्ये देखील काही प्रमाणात गॅस साठा शिल्लक असल्याचं या कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र हे सर्व स्त्रोत सोडता भारताकडे एलपीजी स्टोरेज ची आणखी कोणतीही जागा नाही. सातत्याने सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या पुरवठ्यामुळे सरकारने एलपीजी गॅस साठवणुकीवर लक्ष दिलं नाही. आणि आखातातील युद्धाच्या झळा स्वयंपाक घरात पर्यंत पोहोचल्या त्यामुळे ही सरकारची चूक आहे. असं म्हणत विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे.

 

follow us