शेतकरीच नालायक, त्याला काय करणार? तोंडात मारून घेतले पाहिजे…अॅड. प्रकाश आंबेडकरांचे अजब विधान
Prakash Ambedkar : चारा आणि पाणी उपलब्ध करून दिले नाही, तर त्यांनी मंत्री, आमदार, खासदार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या घरांसमोर जाऊन जाब विचारावा.
Prakash Ambedkar On Farmer : वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दुष्काळ, शेतकऱ्यांची परिस्थितीवर बोलताना ते आक्रमत झाले. शेतकऱ्यांसाठी लढणारे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना मतदान न केल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना सवाल करताना अजब विधान केले आहे.शेतकरीच नालायक आहे, त्याला काय करणार,” असे वक्तव्य करत त्यांनी शेतकऱ्यांवर टीका केली. तुपकर शेतकऱ्यांसाठी लढत असताना त्यांना मतदान न केल्याबद्दल शेतकऱ्यांनी स्वतःलाच जाब विचारायला हवा, असे ते म्हणाले.
दुष्काळाच्या नियोजनावरून सरकारला घेरलं
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना सरकारकडून योग्य नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. अल निनोचा संभाव्य परिणाम माहीत असतानाही अन्नधान्य, पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत पुरेशी तयारी करण्यात आली नाही. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. अकोल्यातील सभेत या मुद्द्यावर भाष्य केल्यानंतर एका मंत्र्याला पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्याची आठवण झाली, अशी टीकाही त्यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांना अन्नधान्य, चारा आणि पाणी उपलब्ध करून दिले नाही, तर त्यांनी मंत्री, आमदार, खासदार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या घरांसमोर जाऊन जाब विचारावा, असे आवाहन आंबेडकरांनी केला आहे.
‘अब देश जवाब देगा’, राहुल गांधींची घोषणा, 1 नोव्हेंबरला दिल्लीत ‘व्होट बचाओ–देश बचाओ’ रॅली
शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या तुपकरांना मतदान का केलं नाही?
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या भूमिकेचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांच्या मतदानाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्याला शेतकऱ्यांनीच मतदान केले नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकरीच नालायक आहे, त्याला काय करणार,” असे वक्तव्य करत त्यांनी शेतकऱ्यांवर टीका केली. तुपकर शेतकऱ्यांसाठी लढत असताना त्यांना मतदान न केल्याबद्दल शेतकऱ्यांनी स्वतःलाच जाब विचारायला हवा, अशा आशयाचे विधान त्यांनी केले.
दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण; चार दिवसांत चांदी 16 हजारांनी स्वस्त, तर सोने कितीने कमी ?
शेतकरी आत्महत्यांवरही आक्रमक भूमिका
शेतकरी आत्महत्यांच्या घटनांवर भाष्य करताना आंबेडकर यांनी राजकीय नेत्यांवरही निशाणा साधला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी नेत्यांनी जाण्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना आत्महत्येपर्यंत पोहोचवणाऱ्या परिस्थितीला जबाबदार असलेल्यांना जाब विचारण्याची गरज आहे. जे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या कुटुंबाला पुढाऱ्यांनी भेटायला जाता कामा नये. या मताचा मी झालो आहे. तुम्हाला कोणी सांगितलं आत्महत्या करायला. मरायचं असेल तर दहा-बारा पुढार्यांना मारा आणि मरा, असे वादग्रस्त विधान प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील खर्चावर प्रश्न
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरूनही प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांच्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला. उमेदवारांनी प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याचा दावा करत हा पैसा नेमका कुठून आला. या खर्चाची प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशी होणार का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शिक्षकांना पाच हजार म्हणा, उमेदवारांवर बोचरी टीका
शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा संदर्भ देत आंबेडकर यांनी उमेदवारांवर उपरोधिक टीका केली. शिक्षक मतदारांनी उमेदवारांना मतदान करताना पैशांना महत्त्व दिल्याचा आरोप करत त्यांनी शिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिक्षकांना त्यांच्या पदाऐवजी पाच हजार रुपये असे म्हणा, असे आंबेडकर म्हणाले.