Pakistan News : पाकिस्तानात मोठी घडामोड; माजी पंतप्रधानाची मुलगी पहिली महिला CM

Pakistan News : पाकिस्तानात मोठी घडामोड; माजी पंतप्रधानाची मुलगी पहिली महिला CM

Pakistan Latest News : पाकिस्तानात निवडणुका होऊन पंधरा दिवस उलटून (Pakistan News) गेले आहेत तरी देखील पंतप्रधान कोण होणार याचा निर्णय झालेला नाही. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांची मुलगी मरियम नवाज हीने इतिहास रचला आहे. पाकिस्तानच्या पश्चिम पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियु्क्ती करण्यात आली. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. मरियम नवाज यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मरियम नवाज यांना प्रांतीय विधानसभेत एकूण 220 मते मिळाली. 2012 मध्ये त्यांनी पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला होता. या विजयानंतर त्यांनी आगामी काळात देशाला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याचे सांगितले.

Pakistan Election : पाकिस्तानच्या निवडणुकीत मोठ्ठा घोटाळा! ‘त्या’ आरोपांची होणार चौकशी

पाकिस्तानच्या निवडणुकीत घोटाळा 

पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार रावळपिंडीचे माजी आयुक्त म्हणाले, मी या गडबडीची संपूर्ण जबाबदारी घेतो. मुख्य निवडणूक आयुक्त आणि सरन्यायाधीश यांचा यामध्ये पूर्णपणे सहभाग आहे. याआधी चठ्ठा यांनी या प्रकाराची जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पाकिस्तान निवडणूक आयोगाने मात्र चठ्ठा यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

निवडणूक आयोगाने या आरोपांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. रावळपिंडीचे नवनियुक्त आयुक्त सैफ अन्वर जप्पा यांनी मात्र निवडणुकीतील अनियमिततेचे आरोप फेटाळून लावले.

निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत सिंध प्रांतात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही मिळाले. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीनंतर पीटीआय, जमात ए इस्लामीसह अन्य काही पक्ष दावा करत आहेत की त्यांच्या उमेदवारांना जाणूनबुजून पराभूत करण्यात आले. त्यामुळे निकाल कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही.

Pakistan : घोषणा नाही, कारणही नाही तरीही ‘एक्स’ ठप्प; पाकिस्तानात सात दिवसांपासून चाललंय काय?

पाकिस्तानातील सोशल मीडियावर निर्बंध 

निवडणुकीतील फसवणुकीचे आरोप मात्र फेटाळून लावण्यात आले होते. पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाने गुरुवारी सांगितले होते की सोशल मीडियावरील पक्षाचा आवाज दाबण्याच्या हेतूने अधिकाऱ्यांनी एक्स बंद केले आहे. अमेरिकी परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनीही पाकिस्तानातील या घडामोडींवर चिंता व्यक्त केली. पाकिस्तानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संघटनांनवरील निर्बंध आणि प्रतिबंधावर चिंता व्यक्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube