Pakistan : घोषणा नाही, कारणही नाही तरीही ‘एक्स’ ठप्प; पाकिस्तानात सात दिवसांपासून चाललंय काय?

Pakistan : घोषणा नाही, कारणही नाही तरीही ‘एक्स’ ठप्प; पाकिस्तानात सात दिवसांपासून चाललंय काय?

Pakistan Social Media Shut Down : पाकिस्तानात निवडणुका होऊन पंधरा दिवस (Pakistan) उलटून गेले आहेत तरी सरकार अस्तित्वात आलेले नाही. सध्या येथे मोठा राजकीय गोंधळ सुरू आहे. पाकिस्तानचा पंतप्रधान कोण होणार (Pakistan Elections) यावर अद्याप निर्णय नाही तर दुसरीकडे लोकांच्या सोशल मीडियावरही (Social Media) बंधने आणण्यात आली आहेत. मागील सात दिवसांपासून देशात ‘एक्स’ (आधीचे ट्विटर) अकाउंट बंद करण्यात आले आहे. यामागे कारणही दिलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिक हैराण झाले असून संताप व्यक्त करत आहेत.

विदेशी वृत्तसंस्था एपीने यामागचे कारण जाणून घेण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी इंटरनेट सेवा आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. या समस्येबाबत अमेरिकेनेही पाकिस्तानला निर्बंध हटवण्याचे आवाहन केले आहे. निवडणुकीत फसवणूक झाल्याचा आरोप करत देशव्यापी आंदोलनाची घोषणा इम्रान खान यांच्या पक्षाने केली होती. तेव्हापासूनच देशातील सोशल मीडियावर निर्बंध आणण्यास सुरुवात झाली होती.

Pakistan : अखेर तिढा सुटला! पाकिस्तानात ‘पीपीपी’-‘पीएमएल-एन’चे सरकार; शहबाज शरीफ होणार PM

पाकिस्तानात इम्रान खान यांचे (Imran Khan) समर्थक सरकारचा तीव्र विरोध करत होते. यासाठी सोशल मीडियाचा भरपूर वापर केला जात होता. यानंतर देशात तणावाचे वातावरण तयार झाले होते. खान यांच्या समर्थकांनी निवडणूक निरीक्षण संस्थेवर इम्रान खान यांची मते चोरल्याचा आरोप केला होता. ठिकठिकाणी निदर्शनेही केली होती. त्यामुळे देशात तणावाचे वातावरण होते जे अजूनही कायम आहे.

निवडणुकीतील फसवणुकीचे आरोप मात्र फेटाळून लावण्यात आले होते. पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाने गुरुवारी सांगितले होते की सोशल मीडियावरील पक्षाचा आवाज दाबण्याच्या हेतूने अधिकाऱ्यांनी एक्स बंद केले आहे. अमेरिकी परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनीही पाकिस्तानातील या घडामोडींवर चिंता व्यक्त केली. पाकिस्तानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संघटनांनवरील निर्बंध आणि प्रतिबंधावर चिंता व्यक्त केली.

Pakistan Election : नवाज शरीफांना धक्का! ‘या’ तीन मतदारसंघातील निवडणूकच रद्द

निवडणुकीत मोठ्या घोटाळ्याचा आरोप 

दरम्यान, याआधी रावळपिंडीचे माजी आयुक्त लियाकत चठ्ठा यांनी शहरातील निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांना विजयी केले गेले असा आरोप केला होता. रावळपिंडीत 13 उमेदवारांना जबरदस्तीने विजयी घोषित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाने 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हेराफेरी आणि पक्षाला दिलेला जनादेश हिसकावून घेण्याच्या विरोधात देशव्यापी निदर्शने सुरू केली असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube