Video : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जेलमध्ये आहेत का?, बहिण खातून काय म्हणाल्या?

इमरान खान यांची बहिण उज्मा खातून यांनी रावलपिंडीच्या अडियाला जेलमध्ये त्यांची भेट घेतली. सुमारे 20 मिनिट त्यांची चर्चा झाली.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 02T192814.661

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे गेल्या काही दिवसांपासून अडियाल तुरुंगात आहेत. (Imran Khan) त्यानंतर शहबाज सरकाराने त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली नव्हती. आता एक ते दीड महिन्यांपासून इमरान खान जिवंत आहेत की त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं आहे? याबाबत माहिती समोर आली नव्हती. आज  इमरान खान यांची बहिण अडियाल तुरुंगात जाऊन त्यांची भेट घेऊन आल्या आहेत.

इमरान खान यांची बहिण उज्मा खातून यांनी रावलपिंडीच्या अडियाला जेलमध्ये त्यांची भेट घेतली. सुमारे 20 मिनिटांच्या भेटीनंतर त्या जेलबाहेर आल्या आणि इमरान यांच्या स्थितीबद्दल माहिती देऊ लागल्या. उज्मा यांनी सांगितलं की, इमरान खान यांची प्रकृती ठिक आहे, पण त्यांना एकांतवासात (आयसोलेशन) ठेवण्यात आलं आहे. जेलमध्ये त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे.

इंटरनेटवरून इमरान खान यांचे फोटो हटवले, मुलगा कासिमचा मोठा दावा, नक्की काय घडतय?

4 नोव्हेंबर इम्रान खान यांची दुसरी बहिण अलीमा खान त्यांना भेटल्या होत्या तेव्हा त्यांच्याबाबतची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत विविध अफवा आणि तर्कवितर्क लावले जात होते. आज इमरान खान यांची भेट घेण्यासाठी अडियाला जेलबाहेर हजारो पीटीआय समर्थक जमले होते. अनेक ठिकाणी पोलीस आणि समर्थकांमध्ये धक्काबुक्की आणि मारामारी झाली. समर्थक इमरानला सोडा, इमरान खान झुकणार नाही अशा घोषणा करत होते.

अलीमा खान यांच्या म्हणण्यानुसार, जेल प्रशासन कोर्टाच्या आदेशांचा अवमानना करत आहे. पीटीआय समर्थकांच्या विरोधाला पाहता इस्लामाबाद आणि रावलपिंडीत पुढील दोन आठवड्यांसाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आता जनतेपुढे शहबाज सरकार झुकले असल्याचे दिसत आहे. इमरान यांच्या बहिणाला त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान, इमरान खानच्या बहिणी आणि मुलगे सातत्याने सरकारकडे त्यांच्या जिवंत असल्याचा पुरावा मागत असताना सरकाराने मात्र मौन बाळगले होते. आता अखेर त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

follow us