महाराष्ट्रातील 2 हजार 869 जागांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक जागा महायुतीच्या झोळीत; वाचा राज्यभरातल अपडेट
ठाकरे बंधूंची युती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांना अनेक ठिकाणी परभवाचा सामना करावा लागला आहे.
BJP Devednra Fadnavis and Eknath Shinde Shiv Sena Alliance Results : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान झाल्यानंतर आज (१६ जानेवारी) मतमोजणी झाली. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह २ हजार ८६९ जागांसाठी मतमोजणी सुरू असतानाच भाजपा, शिवसेना (शिंदे) यांच्या महायुतीने अर्ध्याहून अधिक जागांवर बाजी मारली आहे. ठाकरे बंधूंची युती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांना अनेक ठिकाणी परभवाचा सामना करावा लागला आहे.
दुपारपर्यंत भाजपाने २,८६९ जागांपैकी १७०० जागांचे कल समोर आले आहेत. ज्यात १२०० हून अधिक जागांवर विजय मिळवला असल्याचे समोर आले आहे. तर अनेक ठिकाणी महायुतीमधील भाजपा, शिवसेना (शिंद) आघाडीवर आहेत. त्याखालोखाल काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाला यश मिळालेले दिसत आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि मनसेला मोठे यश मिळालेले नाही.
एक्झिट पोलचे अंदाज काय होते?
जेव्हीसी, एक्सिस माय इंडिया – आज तक, प्राब, जनमत आणि जेडीएस यांचे एक्झिट पोल मतदानानंतर समोर आले होते. अनेक एक्झिट पोल्सनी महायुतीच्या हातात बहुतेक महानगरपालिकांची सत्ता जाईल, असे अंदाज वर्तवले होते.
एमआयएमला आश्चर्यकारक आघाडी
महायुतीची घोडदौड सुरू असताना एमआयएम पक्षालाही बऱ्यापैकी जागा मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी, राज ठाकरेंची मनसे आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचितपेक्षाही एमआयएमला अधिक जागा मिळाल्याचे सध्या दिसत आहे.
