“नेतन्याहूंच्या ऑफिसवर हल्ला ; इराणच्या ‘शॅडो मास्टर’चा मास्टरस्ट्रोक!”
Benjamin Netanyahu : "जगातील सर्वात प्रगत मानली जाणारी 'मोसाद' (Mossad) कुठे होती? इस्रायलचे अभेद्य 'आयर्न डोम' (Iron Dome) का
Benjamin Netanyahu : “जगातील सर्वात प्रगत मानली जाणारी ‘मोसाद’ (Mossad) कुठे होती? इस्रायलचे अभेद्य ‘आयर्न डोम’ (Iron Dome) का फेल ठरले? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इराणचा तो ‘अदृश्य हात’ जो थेट इस्रायलच्या सत्तेच्या केंद्रस्थानी जाऊन धडकला, तो कोणाचा? हा केवळ एक लष्करी हल्ला नाही, तर हा एस्माईल कानी (Esmail Qaani) यांचा जगाला दिलेला एक अत्यंत भयानक संदेश आहे!”
“जानेवारी 2020 मध्ये जेव्हा अमेरिकेने कासिम सुलेमानींना संपवलं, तेव्हा जगाला वाटलं इराणचा कणा मोडला. पण इराणने त्यांच्या जागी अशा एका माणसाला बसवलं जो सुलेमानींपेक्षा जास्त शांत आणि तितकाच घातक आहे. ब्रिगेडियर जनरल एस्माईल कानी. सुलेमानी हे ‘सेलिब्रिटी कमांडर’ होते, ते कॅमेऱ्यासमोर दिसायचे. पण कानी हे ‘पडद्यामागचे खेळाडू’ आहेत. त्यांनी गेल्या 6 वर्षात इराणच्या ‘Axis of Resistance‘ (प्रतिरोधाचा अक्ष) ला इतकं मजबूत केलंय की आज इस्रायल चहूबाजूंनी वेढला गेला आहे.”
इराण लां माहित आहे की, ते समोरासमोरच्या युद्धात अमेरिकेच्या ‘फिफ्थ जनरेशन’ विमानांशी लढू शकत नाहीत. म्हणून कानी यांनी ‘बाजी पलटवण्यासाठी’ एक नवीन स्ट्रॅटेजी वापरली – The Drone Swarm (ड्रोनचा थवा). काल नेतन्याहूंच्या ऑफिसवर झालेला हल्ला हा याच रणनीतीचा भाग होता. हे ड्रोन्स स्वस्त आहेत, पण ते राडारला चकवा देण्यात माहीर आहेत. एका बाजूला इस्रायल अब्जावधी डॉलर्सची ‘इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रे डागतंय, तर दुसरीकडे कानी अवघ्या काही हजार डॉलर्सच्या स्वस्त ड्रोनने इस्रायलच्या अर्थव्यवस्थेला खिळ घालतायत. हे आहे इराणचं ‘इकोनॉमिक आणि सायकॉलॉजिकल वॉर’.
“कानी यांचा खरा मास्टरस्ट्रोक हा लष्करी नाही, तर मानसिक आहे. जेव्हा देशाच्या पंतप्रधानांचे ऑफिस सुरक्षित नसते, तेव्हा त्या देशातील गुंतवणूकदार घाबरतात. इस्रायलमधील टेक कंपन्यांचे शेअर्स घसरत आहेत, विदेशी गुंतवणूक बाहेर जात आहे. आणि इकडे इराण, रशिया आणि चीनच्या मदतीने एक नवीन आर्थिक गट तयार करत आहे. बाजी इथेच पलटतेय! अमेरिका आणि इस्रायलला लष्करी गुंतवून ठेवून, इराण जागतिक व्यापाराचा (Global Trade) चेहरा बदलण्याचा प्रयत्न करतोय.”
OpenAI च्या पेंटागॉनसोबत करार, भविष्याची चिंता अन् अमेरिकन लोकांकडून ChatGPT अनइंस्टॉल; प्रकरण काय?-
नेतन्याहूंच्या ऑफिसवर झालेला हा हल्ला म्हणजे इराणने केलेली ‘चेक’ (Check) आहे. आता प्रश्न हा आहे की इस्रायल ‘चेकमेट’ होण्यापूर्वी काय पाऊल उचलणार? एस्माईल कानी यांच्याकडे अजून असे किती पत्ते शिल्लक आहेत? हे युद्ध आता केवळ भूमीवर उरलेलं नाही, ते सायबर स्पेस, शेअर मार्केट आणि जगाच्या नकाशावर खेळलं जातंय.” हा केवळ इराण-अमेरिका संघर्ष नाही, तर हे जागतिक सत्तेचं नवीन समीकरण आहे.
