Video : ‘एक हिंदुस्तानी’ ने 9/11 होण्यापासून वाचवलं’; PM मोदींकडून कॅप्टन मच्छार यांना शाबासकी

PM Modi On Captain Smit Machchhar 174 प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांची पाठ मोदींनी थोपटली...

  • Ninad K
  • Written By: Published:
PM Modi On Pilot Smit Machchhar

Indian Pilot Smit Machchhar Prevented Another 9/11 Makes Us Proud Says PM Modi : आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानात अचानक जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली… कॉकपिटमध्ये हल्ला झाला, विमानाची उंची वेगाने कमी होऊ लागली आणि काही क्षणांत 174 प्रवाशांचा जीव धोक्यात आला. अशा वेळी जखमी अवस्थेतही कॉकपिटचा दरवाजा उघडून प्रवाशांना आणि क्रूला हस्तक्षेपाची संधी देणाऱ्या भारतीय पायलट कॅप्टन स्मित मछार यांच्या धाडसाची जगभर चर्चा होत आहे. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांना ‘खरा हिरो’ म्हटलं, तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मच्छार यांच्या शौर्याचा उल्लेख करत एक हिंदुस्तानी ने 9/11 होण्यापासून वाचवलं असे म्हणत कौतुक केलं आहे. UPSC च्या शताब्दी कार्यक्रमात मोदी बोलत होते.

Smit Machchhar : 174 जणांचे प्राण वाचवणारे मच्छार होणार इस्राइलचे ‘सरकारी पाहुणे’; सत्य काय?

‘एका हिंदुस्तानीने 9/11 होण्यापासून वाचवलं’

दिल्लीतील UPSC च्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचा विशेष उल्लेख केला. मच्छर यांचे कौतुक करताना मोदी म्हणाले की,“एका हिंदुस्तानीने 9/11 सारखा हल्ला होण्यापासून वाचवलं,” असा उल्लेख इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केल्याचे म्हटले आहे. यावेळी मोदींनी स्मित यांच्या धैर्याचं आणि प्रसंगावधानाचं कौतुक करताना त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधल्याचंही सांगितलं. स्मित यांच्या उत्तम आरोग्यासाठी देशवासीयांनी प्रार्थना करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

जखमी झाले, पण हार मानली नाही

30 सप्टेंबरला दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या Flydubai च्या FZ1073 विमानात कॉकपिटमध्ये गंभीर संघर्ष झाला. उपलब्ध वृत्तांनुसार, सह-पायलटने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला. या झटापटीदरम्यान विमानाची उंची झपाट्याने कमी झाली आणि परिस्थिती गंभीर बनली. स्मित मच्छार जखमी झाले होते. मात्र, या गंभीर अवस्थेतही त्यांनी प्रतिकार केला आणि कॉकपिटचा दरवाजा उघडण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर प्रवासी आणि विमानातील इतर क्रू सदस्यांना कॉकपिटमध्ये प्रवेश करून हल्लेखोराला नियंत्रणात घेण्याची संधी मिळाली. विमानाला सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. विमानातील 174 जणांचे प्राण वाचले, अशी माहिती नेतन्याहू यांनी दिली आहे.

Flydubai घटनेनंतर ‘कॉकपिट बॅकअप’ चर्चेत; दोन्ही पायलट जखमी झाले तर, विमान कोण उडवतं?

नेतन्याहूंनी म्हटलं ‘खरा हिरो’

Flydubai विमानातील घटनेनंतर इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांचं विशेष कौतुक केलं आहे. जखमी असूनही मच्छार यांनी प्रतिकार केला, कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि प्रवासी व क्रूला हल्लेखोरावर नियंत्रण मिळवण्याची संधी दिली, असं नेतन्याहूंनी म्हटलं. 174 प्रवाशांचे प्राण वाचवले,” असा उल्लेख करत नेतन्याहूंनी स्मित यांना ‘खरा हिरो’ संबोधलं आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. PM Modi On Captain Smit Machchhar 

मच्छार यांचं नाव केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मच्छार हे मुंबईचे असून त्यांना सुमारे 15 वर्षांचा विमान उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी SpiceJet मध्ये 11 वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर 2022 मध्ये Flydubai मध्ये कॅप्टन म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्याकडे 9,750 पेक्षा अधिक उड्डाण तासांचा अनुभव असल्याचं रॉयटर्सने नमूद केलं आहे.

‘9/11’चा उल्लेख का झाला?

नेतन्याहू यांनी या घटनेची तुलना 9/11सारख्या मोठ्या हवाई दुर्घटनेच्या संभाव्य धोक्याशी केली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनीही आपल्या भाषणात नेतन्याहूंच्या या उल्लेखाचा संदर्भ दिला. मात्र, 9/11 शी थेट तुलना ही नेत्यांची प्रतिक्रिया असून, घटनेच्या तपासातून सिद्ध झालेला अधिकृत निष्कर्ष नाही. Flydubai घटनेमागचा हेतू आणि संपूर्ण घटनाक्रम याबाबतचा तपास सध्या सुरू आहे. घडलेली घटना 9/11 सारखं म्हणण योग्य ठरणार नाही.

Flydubai Flight : हल्ला करणाऱ्या वैमानिकाचा गळा दाबला, बाहेर ओढलं…इस्रायली नागरिकाने थरार सांगितला

भारतासाठी अभिमानाचा क्षण

आकाशात संकट ओढवलं, स्वतःचा जीव धोक्यात आला, तरी परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देण्यासाठी केलेला प्रयत्न कॅप्टन स्मित मच्छार यांच्या या कृतीमुळे त्यांचं नाव जगभर चर्चेत आलं आहे. Flydubai च्या विमानात काही मिनिटांसाठी निर्माण झालेलं संकट किती मोठ्या दुर्घटनेत बदलू शकलं असतं, याची कल्पना या घटनेवरून येते. मात्र त्या क्षणी कर्तव्य, धैर्य आणि प्रसंगावधान दाखवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांची कहाणी आज करोडो भारतीयांसाठी अभिमानची बाब ठरली आहे.

follow us