‘मोठा गडी दमला, आता लहान्या गड्याचा नंबर’; मनोज जरांगेंचा फडणवीसांसह महायुतीवर निशाणा

Manoj Jarange targets Fadnavis: मराठा समाजाच्या प्रश्नांवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

Manoj Jarange targets Fadnavis over Maratha reservation

Manoj Jarange targets Fadnavis over Maratha reservation:
मराठा समाजाच्या प्रश्नांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मराठा समाजाच्या आडवं येणाऱ्याला टिकू देऊ नका, तरुणांना व्यवसायाकडे वळवा आणि त्यांना नोकऱ्या मिळवून द्या, असं आवाहन त्यांनी समाजाला केलं. तसेच मराठा आरक्षणाला धक्का न लावता राजकारण करा, असा इशाराही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांवरही टीका केली.

गंभीर घटना! बीडमध्ये घरात घुसून महिलेचं अपहरण; दोन चिमुरड्यांनाही बेदम मारहाण

चिंचपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात मनोज जरांगे बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाची सद्यस्थिती, आरक्षण, राजकारण आणि कथित 500 कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपवर भाष्य केलं.

मराठा तरुणांना व्यवसाय आणि नोकऱ्यांकडे वळवा

मराठा समाजातील तरुणांनी केवळ राजकीय प्रचाराच्या मागे न लागता स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावं, असं जरांगे म्हणाले. मराठा तरुणांना व्यवसायाकडे वळवा, त्यांना नोकऱ्या मिळवून द्या. तरच समाज टिकेल, असं आवाहन त्यांनी केलं.

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याची निवृत्तीची घोषणा, अचानक नक्की काय घडलं?

समाजातील अधिकाऱ्यांना सरकारी नोकरीत बढती मिळत नाही, तर गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यात अडचणी येतात, असंही त्यांनी नमूद केलं. पूर्वी 50 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडे आता अर्धा एकर जमीन उरली आहे. त्यामुळे समाजाच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘मराठा आरक्षणाला धक्का न लावता राजकारण करा’

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं. आरक्षण देणारे पण आहेत आणि रद्द करणारे पण आहेत. किती दिवस करतील…फक्त दोन वर्ष राहिलेत. यांना असं वाटतंय की सत्ता आपल्याकडे आली म्हणजे आपण अमरत्व प्राप्त केलं, असा त्यांचा गैरसमज झाला. त्यांच्या लक्षात येत नाही की, त्यांना गोरगरीबांनी मतदान केलं. आता यांना चढलेली मस्ती बाहेर काढायचीय. मराठा आरक्षणाला धक्का न लावता राजकारण करा, असं माझं म्हणणं आहे.

पंढरपुरात विहीर खोदताना मोठी दुर्घटना; ढिगाऱ्याखाली 4 मजूर अडकले, बचावकार्य सुरु

मी चुकला की कोणालाही सोडत नाही, मग ती महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘मोठा गडी दमला, आता लहान्या गड्याचा नंबर’

यावेळी जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. ‘मोठा गडी (देवेंद्र फडणवीस) तर दमला, आता लहान्या गड्याचा नंबर आहे,’ असं विधान त्यांनी केलं. तसेच सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनाही आरक्षण लागत नाही का, असा सवाल उपस्थित केला. आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनाही मोठं होऊ द्या, तुम्ही तर आधीच मोठे आहात, असं ते म्हणाले.

‘मी ज्याच्या गाडीत बसतो, त्याचीच ईडी चौकशी सुरू होते’

ईडीच्या चौकशीवरूनही जरांगे यांनी मिश्किल टिप्पणी केली. ‘मी ज्याच्या गाडीत बसतो, त्याचीच ईडीची चौकशी व्हायला लागते. कधीकधी वाटतं, मला एसटीने किंवा रिक्षाने फिरायची वेळ येते की काय? हे रिक्षावाल्यालाही आतमध्ये टाकतील,’ असं ते म्हणाले.

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना पाच चुका टाळा, अन्यथा व्याजातून होणारी कमाई घटेल ?

पुढे बोलताना, ‘ते एक फासा टाकतात, तर मी दुसरा फासा टाकतो. मी पण काही कमी नाही,’ असंही जरांगे यांनी सांगितलं.

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून भाजप आणि शिंदे गटावर आरोप

कथित 500 कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपचा मुद्दाही जरांगे यांनी उपस्थित केला. शिंदे साहेबांना विचारलं मला 500 कोटी दिले होते का? ते नाही बोलले. मला दिल्लीतून फोन आले की, ती कॉल रेकॉर्डींगमधील बाई खोटं बोलू शकत नाही, मग 500 कोटी गेले कुठं? आता शिंदे गटातले म्हणतात आम्हाला भाजपने पैसे दिले नाहीत मग आमचं नाव का बदनाम केलं? त्यामुळे भाजपने आणि शिंदेगटाने ठरवलं की, ही ऑडिओ क्लिप खोटी ठरवायची, असे मनोज जरांगे म्हणाले.

follow us