Israel Hamas War दरम्यान बायडेन यांचा नेतन्याहूंना फोन; म्हणाले, गाझा अन् हमास…

Israel Hamas War दरम्यान बायडेन यांचा नेतन्याहूंना फोन;  म्हणाले, गाझा अन् हमास…

Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन म्हणजेच हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. या युद्धात इस्त्रायली नागरिक आणि पॅलेस्टिनी यांच्यासह अनेक विदेशी नागरिकांचा या युद्धात बळी गेला आहे. आतापर्यंत युद्धात 9 हजार हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. तर या संघर्षात 19 हजार 450 लोक जखमी झाले आहेत. या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नेतन्याहू यांना फोन केला आहे.

बायडेन यांचा नेतन्याहूंना फोन…

या युद्धावर अगोदर देखील बायडेन यांनी टीपण्णी केली होती. त्यात आता त्यांनी पुन्हा एकदा इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन केला आहे. इस्त्रायलला आपलं संरक्षण करण्याचा हक्क आहे. मात्र आंतरष्ट्रीय कायद्यांनुसार नागरिकांच्या सुरक्षेला प्रधान्य देणं गरजेचं आहे. त्यामुळे गाझातील सामान्य नागरिक आणि हमास हे दोन वेगवेगळे लोक आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांवर हल्ले केले जाऊ नये.

Andhra Tarin Accident मध्ये मृतांचा आकडा वाढला; 13 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

दुसरीकडे जगभरातून पडसाद उमटत आहेत की, गाझामध्ये मानवतेच्या मुल्यांची पायमल्ली होत आहे. सामान्य नागरिकांवर हल्ले आणि अन्न पुरवठा खंडीत करण्यात आला. यावर अमेरिकेने गाझातील घटनेचा आढावा घेतला. तसेच हमासने कैद केलेल्या नागरिकांवर देखील चर्चा केली. अशी अधिकृत माहिती व्हाईट हाऊसकडून करण्यात आली आहे.

Pune Crime : धक्कादायक! घरात घुसला अन्… पुण्यात थरारक खून

या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने जनरल असेब्लीच्या विशेष सत्रामध्ये शुक्रवारी इस्त्रायलकडून गाझापट्टीवर होणारे प्रतिहल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. या प्रस्तावाला दोन तृतीयांश मत मिळाली आणि तो पारित करण्यात आला. दुसरीकडे या प्रस्तावाला 120 मतदान झालं ज्यामध्ये 14 मत या प्रस्तावाच्या विरोधात होती. तर 45 देशांची या सभेला हजेरी नव्हती त्यात भारत देखील होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube