Pune Crime : धक्कादायक! घरात घुसला अन्… पुण्यात थरारक खून

Pune Crime : धक्कादायक! घरात घुसला अन्… पुण्यात थरारक खून

Pune Crime : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime) वाढल्या आहेत. त्यात आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी एका घरात घुसून एका पाठोपाठ एक अशा तिघांना गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. घोरपडे पेठेतील सिंहगड चौकात हा थरारक खुनाचा प्रकार घडला आहे.

घरात घुसून तीन गोळ्या घातल्या

रविवारी 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अंदाजे 2 वाजेच्या सुमारास घोरपडे पेठेतील सिंहगड चौकात ही खुनाची घटना घडली. येथे राहत असलेले अनिल साहू (वय 35) हे गाढ झोपेत होते. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती तेथे आला त्याने साहू यांना एकामागे एक तीन गोळ्या घातल्या. यावेळी साहू यांचे कुटुंबीय देखील घरातच होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

Maratha Reservation उपसमितीची आज बैठक; सरकार काय निर्णय घेणार?

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्कळ या घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. तर एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहर आणि परिसरात खळबळ माजली आहे. तर पोलिसांनी या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे.

Rahul Narvekar यांनी घेतला कायदेशीर सल्ला; आजच्या सुनावणीत न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

दुसरीकडे शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गेल्या कित्येक दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात नेमकं चाललय तरी काय? असा सवाल सामान्य पुणेकर नागरिक करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube