शैक्षणिक सहलीची बस उलटली; नेवाशातील तीन शिक्षकांसह अकरा विद्यार्थी जखमी
ST BUS- टायर फुटून झालेल्या अपघातात बस पलटी होऊन यामध्ये दोन शिक्षकांसह एक शिक्षिका तसेच अकरा शालेय विद्यार्थी जखमी झालेत.
पुणे: शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या बसला गुरुवारी रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे अपघात झाला. डुंबरवाडीजवळ चालत्या एसटी बसचे (ST BUS) टायर फुटून झालेल्या अपघातात बस पलटी होऊन यामध्ये दोन शिक्षकांसह एक शिक्षिका तसेच अकरा शालेय विद्यार्थी जखमी झालेत. (Educational trip bus accident Eleven students, including three teachers, injured in Newsa)
वनजमीन हडपली अन् सरकारलाच विकली; भाजप नेता म्हात्रेविरुद्ध मनी लॉंड्रिंगचा गुन्हा
नेवासा तालुक्यातील शहाली पिंप्री (Shali pimpri) येथील प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरी ते सातवी या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गुरुवारी पहाटे शिवनेरी, लेण्याद्री,ओझरला जाण्यासाठी निघाली होती. ही बसला सकाळी ओझरजवळ अपघात झाला. या अपघातात 14 जण जखमी झालेत. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही समावेश आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी चालकाला डुलकी लागल्यामुळेच हा अपघात झाल्याची चर्चा अपघातस्थळी सुरू होती.
चेक बाऊन्स प्रकरण अन् थेट मुक्काम पोस्ट तिहार जेल! राजपाल यादवचं नक्की काय चुकलं?
नेवासा तालुक्यात शहाली पिंप्री हे गाव असून नेवासे बस आगाराऐवजी शेवगांव आगाराची बस (क्र.एम.एच 14 एल. एक्स.6747) ही या शालेय विद्यार्थ्यांना घेवून गेलेली असून नेवासे तालुक्याच्या सहलीत शेवगाव आगाराची ही बस कशी आली अशीही चर्चा आता सुरु झाली आहे. या झालेल्या अपघातात एका विद्यार्थांच्या बरगडीला तसेच एका विद्यार्थ्यांच्या हाताचा कोपरा फॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. या बसचे टायर फुटून बसने पलटी घेतल्यामुळे ही बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. या अपघाताची माहिती मिळताच शहाली पिंप्री गावचे सरपंच सतिष चंदन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थी व शिक्षकांची भेट घेवून मदतीचा हात दिला. अपघातग्रस्तांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती सरपंच सतिष चंदन यांनी दिली.
