बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा
हा नियम सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही बसला लागू होणार असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Gadkari) यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीट बेल्ट अनिवार्य केले जातील, अशी घोषणा केली आहे. हा नियम सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही बसेसना लागू होईल, ज्यामध्ये स्लीपर बर्थवर सीट बेल्ट आवश्यक असलेल्या बसेसचाही समावेश आहे.
बस प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे अनिवार्य केले जाणार आहेत.
स्लीपर बसेस सुरक्षेचे नियम अधिक कडक करण्यासाठी, स्लीपर बसेसमध्ये सीट बेल्टची सुविधा दिली जात आहे. लांब पल्ल्याच्या बसेस आणि महामार्गांवरील अपघातांमध्ये प्रवाशांचे प्राण वाचवणं हा यामागचा हेतू असल्याचं गडकरी म्हणाले.