एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन! शिंदे आघाडीवर, अजित पवार पिछाडीवर… बर्गेंचा मिश्कील टोला
एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनात शिंदे आघाडीवर, पवार मागे!

DCM Eknath Shinde Paying ST employees Outstanding Dues : 88 हजार एसटी कर्मचाऱ्यांना सन 20 ते 24 या कालावधी करिता परिवहन खात्याचा भार असलेले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळात वेतनवाढ जाहीर केली होती. पण त्याचा फरक मात्र देण्यात आला नव्हता. आता फरकाची थकीत सर्व रक्कम देण्याचा निर्णय त्यांनीच घेतला. सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच विषयावर स्वतः लावलेली बैठक रद्द करण्याची नामुष्की ओढवल्याने ते मात्र या स्पर्धेत मागे पडले, असा मिस्किल टोला महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी लगावला आहे.
थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना 48 हप्त्यात
एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employee) 4400 कोटी रुपयांच्या थकीत देण्या संदर्भात विविध संघटनांनी गेल्या आठवड्यात आंदोलनाच्या नोटीस दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) एक बैठक बोलावली होती. पण ती बैठक अचानक रद्द करण्यात आली. याउलट याच सरकारमधील उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः पुढाकार घेतला. बैठक घेतली, त्या बैठकीत ते स्वतः मुख्यमंत्री व परिवहन मंत्री असतानाच्या कालावधीची त्यांनी जाहीर केलेली वेतनवाढ फरकाची थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना 48 हप्त्यात देण्याचा निर्णय घेत बाजी मारली.
या राजकीय स्पर्धेत ज्यांच्याकडे अर्थ खाते आहे, त्या अजित पवारांना मात्र स्वतःच लावलेली बैठक नामुष्कीने रद्द करावी लागल्याने… या स्पर्धेत ते नक्की पिछाडीवर राहिले असल्याचे बरगे यांनी म्हटले (Shrirang Barge) आहे.
अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते!
सन 2018 पासूनचा एसटी कर्मचाऱ्यांचा अंदाजे 1100 कोटी रुपयांचा महागाई भत्ता ( ST employees Outstanding Dues) फरक थकीत असून तो अद्यापि देण्यात आलेला नाही. या संपूर्ण कालावधीत महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही सरकारमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच अर्थ खाते आहे. महागाई भत्त्याची राहिलेली फरकाची रक्कम देण्याची जबाबदारी आता अजित पवारांनी पूर्ण करावी, अन्यथा या राजकीय स्पर्धेत अजित पवार हे पिछाडीवर व शिंदे आघाडीवर असेच म्हणावे लागेल असेही बरगे यांनी म्हटले आहे.