Israel Hamas War : ‘भारत कश्मीरमध्ये तेच करतयं जे इस्त्रायल गाझामध्ये’; मलेशियाच्या माजी पंतप्रधानांचं वादग्रस्त वक्तव्य

Israel Hamas War : ‘भारत कश्मीरमध्ये तेच करतयं जे इस्त्रायल गाझामध्ये’; मलेशियाच्या माजी पंतप्रधानांचं वादग्रस्त वक्तव्य

Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. हमासचा खात्मा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने हल्ले आणखी तीव्र केले आहेत. यामध्ये मलेशियाचे माजी पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी इस्त्रायल गाझा युद्धाची तुलना थेट कश्मीर आणि भारताशीच केलीय.

भारत कश्मीरमध्ये तेच करतयं जे इस्त्रायल गाझामध्ये…

शुक्रवारी 27 ऑक्टोबरला कश्मीरच्या भारतात झालेल्या विलिनीकरणाचा दिवस होता. त्यावेळी पाकिस्तान काळा दिवस पाळतो. तर दुसरीकडे मलेशियाचे माजी पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी इस्त्रायल गाझा युद्धाची तुलना थेट कश्मीर आणि भारचताशी केलीय.

महेश मांजरेकरांविरोधात ‘पॉस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल करा; बालहक्क आयोगाचे आदेश

ते म्हणाले की, ज्या प्रमाणे इस्त्राइल गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांवर अत्याचार करत आहे. त्याचप्रमाणे भारत देखील कश्मीरी लोकांवर अन्याय करत आहे. या पंतप्रधानांनी पहिल्यांदा भारतावर हा आरोप केलेला नाही तर त्यांनी या अगोदरही झाकीर नाईकला मलेशियामध्ये लपण्यासाठी जागा दिली होती. तसेच त्याल संरक्षण देखील दिलं होतं.

Diamond Hub: विरोधक सरकारला टार्गेट करताहेत, डायमंड हब मुंबईतच होणार; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं

मलेशियाचे माजी पंतप्रधान महातीर मोहम्मद यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते मुस्लिम दहशतवादी संघटनांचे समर्थक आहेत. तसेच ते पाकिस्तानला मदत करणारे आहेत. तेसच ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि तुर्की यांच्यासोबत एक नवीन इस्लामिक संघटना निर्णा करू इच्छित आहे. मात्र यातून सौदी अरबच्या दबावामुळे पाकिस्तानने माघार घेतली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube