बापाच्या नात्याला काळीमा! सरपंचपदाच्या निवडणुकीत अडथळा ठरणाऱ्या लेकीला कॅनॉलमध्ये बुडवून मारलं

father Killed daughter नांदेडमध्ये जन्मदात्या पित्याने सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये अडथळा ठरणाऱ्या सात वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे.

Father Killed Daughter

Stain on the father’s relation he drown his daughter in a canal for obstructing the Sarpanch election : गुन्हेगारीच्या किंवा नातलगांनीच नातलगांनाच संपवल्याच्या अनेक घटना आपण वास्तु मात्र नांदेडमध्ये बापाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे ती म्हणजे एका जन्मदात्या पित्याने सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये अडथळा ठरणाऱ्या सात वर्षाच्या मुलीला तेलंगाना मध्ये नेऊन कॅनॉल मध्ये फेकून देऊन तिची हत्या केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पांडुरंग कोंडामंगले असं या 32 वर्षीय पित्याने हे करून कृत्य केला आहे नांदेड मधील मुखेड तालुक्यातील गावातील हा रहिवासी आहे बाराळी या ठिकाणी त्याचं हेअर कटिंग चे दुकान आहे त्याला तीन मुलं आहेत. त्याला गावातील सरपंच पदाची निवडणूक लढवायची होती. मात्र महाराष्ट्रात तीन अपत्य असल्यास निवडणुक लढवता येत नाही. त्यामुळेच या व्यक्तीने आपल्या सात वर्षांच्या मुलीला मारलं असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

India US Trade Deal चा या क्षेत्रांना होणार फायदा; अमेरिकेकडून टॅरिफही 50 टक्के वरून 18 टक्क्यांवर

तीन दिवसांपूर्वी हा व्यक्ती साहित्य खरेदीला जात असल्याचं पत्नीला सांगून तेलंगणा राज्यात गेला होता. त्याने सोबत सात वर्षांची मुलगी प्राचीला देखील सोबत नेलं होतं. तिथेच त्याने तेलंगणातील कट्टापल्ली परिसरातील बोधन रोडवरील एका कॅनॉलमध्ये प्राचीला फेकून दिलं. त्यानंतर तो एकटाच घरी परतला. मात्र इकडे कॅनॉलमध्ये या चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली.

अमेरिकेचं भारताला मोठं गिफ्ट! टॅरिफ 50% वरून 18% पर्यंत घटवला; मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार

या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी तात्काळ तपासाचे सुत्र हालवले. संशयाचे धागेदोरे नांदेडच्या मुखेडपर्यंत पोहचल्याने 30 जानेवारी रोजी संशयित आरोपी म्हणून पांडुरंग कोंडामंगले या क्रुर पित्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र अद्याप मुलाली संपवण्याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. तसेच याबाबत पोलिसांनी देखील कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

अजितदादांच्या विमान अपघातावर भुजबळांचं मोठ वक्तव्य; थेट नाव घेत केला दावा

या घटनेनंतर विविध शक्यतांच्या चर्चा सुरू आहेत. गावामध्ये ग्रामपंचायतच आरक्षण ओबीसीसाठी सुटल्याने त्याला गावातील लोकांनी निवडणुकीसाठी तयार केलं. मात्र त्याला तीन अपत्य असल्याने तिसरं अपत्य हे निवडणुकीमध्ये अडसर ठरत असल्याने छत्रपची संभाजीनगरमध्ये वकिलाचा सल्ला देखील घेतला होता. मात्र त्याने पोटच्या लेकीला अखेर संपवलेच यामध्ये सरपंच आणि आरोपीच्या पत्नीचा देखील सहभाग असल्याचं बोललं जात आहे. सुरूवातीला त्याने आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सांगितलं होतं. मात्र अखेर हा प्रकार उघडकीस आला आहे.

follow us