अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार? मध्यस्थीसाठी गडाखांना पुढे आणणाऱ्या राम शिंदेंना टाळले

Ahilyanagar District Bank election जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे गुलदस्त्यात आहे.

Ahilyanagar District Bank Election

Ahilyanagar District Bank election will uncontested Ram Shinde sidelined from Meeting at Gadakh residence : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीची अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख असून जिल्हा बँक निवडणूक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध व्हावी यासाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अहिल्यानगरच्या निवासस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री शंकरराव गडाख माजी खासदार सुजय विखे यांची बैठक संपन्न झाली. मात्र जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे गुलदस्त्यात आहे.

अ‍ॅपलचा मोठा निर्णय! एका ग्राहकाला दोनच आयफोन; भारत-अमेरिकेत खरेदीवर मर्यादा

दुसरीकडे ही बैठक चर्चेत आली आहे. कारण जिल्हा बँक निवडणूक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध व्हावी यासाठी गडाख यांनी मध्यस्थी करावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या विधान परिषद सभापती राम शिंदे यांनाच या बैठकीतून टाळण्यात आले आहे. त्यामुळे अगोदरच नाराज असलेले शिंदे यामुळे पुन्हा या बैठका आणि चर्चांना नवे वळण मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

SBI ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक; तुमच्या पैशांना किती धोका? काळजी कशी घ्याल

तर दुसरीकडे या जिल्हा बँक निवडणूक बाबत 3 वाजेपर्यंत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केला जाणार नाही. असे विखे व थोरात यांच्याकडूनच हे सांगण्यात आले आहे. तसेच सुजय विखे यांच्या नावाला मोठा विरोध आहे. असं देखील बोललं जात आहे. मात्र अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात असून ते आज 21 ऑक्टोबरला अर्ज मागारीची वेळ संपल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

follow us