Video : पाण्यात तरंगणारी अन् भर रस्त्यात टूंनकन उडी मारणारी कार; चीनच्या ई-कार्सचा नुसता धुराळा…

Why Chinese Cars Are Killing The Auto Market : चारचाकी गाड्या म्हटलं की, डोळ्यासमोर उभ्या टाकतात त्या गाड्या म्हणजे BMW, मर्सिडिज, ऑडी, रेंज रोव्हर, जॅग्वारसह अनेक मोठं मोठे ब्रँड. या ब्रँडपैकी एकतरी गाडी आपल्या ताफ्यात असावी असं प्रत्येकाला वाटतं पण ते सगळ्यांना शक्य होतं नाही म्हणून अनेकजण त्यांना परवडेल अशा ब्रँडच्या गाड्या घेतात.
त्यात गेल्या काही वर्षांपासून ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ग्राहकांच्या आरामदायी प्रवासासाठी प्रत्येक कार उत्पादक कंपनीकडून नवनवीन प्रयोग केले जात आहेत. त्यात स्पर्धापण खूप प्रचंड आहे. त्यात आता ई कार्सचा ट्रेंड प्रंचड वाढला असून, जगातील ऑटो सेक्टरमध्ये सुरू असलेल्या काटे की टक्करमध्ये चीनमधील ई-कार्सच्या काही मॉडेल्सने ऑटो सेक्टरमध्ये अक्षरक्षः धुराळा उडवला आहे. आज आम्ही चीनमधील अशाच काही निवड गाड्यांबद्दल माहिती सांगणार आहोत ज्या वाचून आणि पाहून तुमचे डोळे विस्फारतील. यातील एक गाडी तर चक्क प्रवाशांसह पुराच्या पाण्यातूनही मार्गक्रमण करू शकते. चला तर मग नुसता धुराळा उडवणाऱ्या चीनमधील चारचाकी गाड्यांबद्दल जाणून घेऊया.
जबरदस्त ऑफर, Hyundai Venue वर चक्क 70 हजारांचा डिस्काउंट
Huawei Aito M9 सेल्फ ड्रायव्हिंग असलेली ही गाडी त्याच्या स्टायलिश लूकमुळे सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. यात हुवैईचे अडव्हान्स इंटेलिजंट ड्रायव्हिंग सिस्टमसह लेव्हल 3 चे ऑटोनॉमस ड्रायविंगची सुविधा देण्यात आली आहे. या खास फिचरमुळे ही कार गर्दीच्या ठिकाणी स्वतः निर्णय घेऊन पुढे जाऊ शकते. एवढेच नव्हे तर, ऑटोमॅटिक पार्किंग फिचरमुळे कमी जागा असलेल्या ठिकाणीदेखील ही गाडी आरामात पार्क केली जाऊ शकते. गाडीच्या आतल्या इंटेरिअरबद्दल बोलायचे झाल्यास यात 5G कनेक्टेड असलेली 15 इंचांची ड्युल स्क्रिन देण्यात आली असून, याचे नियंत्रण व्हॉईस कंट्रोलने करता येऊ शकते.
माशासारखी पाण्यात तरंगणारी यांगवांग BTD U8
यानंतर ज्या कारबद्दल आम्ही माहिती सांगणार आहोत ती तर चक्क प्रवाशांसह रस्त्याबरोबर पाण्यातही चालू शकते. BYD ची ही इलेक्ट्रिक SUV कंपनीच्या प्रीमियम ब्रँड YangWang अंतर्गत येते. या कारचे नाव यांगवांग U8 आहे. याची खासियत म्हणजे ही कार माशाप्रमाणे पाण्यात तरंगू शकते. या कारमध्ये असलेल्या अनेक अडव्हान्स फिचरमुळे ही कार पुराच्या पाण्यातून प्रवाशांसह 1 माईल प्रतितास प्रवास करू शकते असा दावा कंपनीने केला आहे. एवढेच नव्हे तर U8 या माॉडेलमध्ये 360 अंशांमध्येदेखील फिरण्याची कॅपॅसिटी आहे त्यामुळे अत्यंत कमी जागा असलेल्या जागेतही ही कार अगदी आरामात पार्क करता येऊ शकते.
किती असते इंजिन ऑइलची लाईफ? खराब ऑईल देईल खिशाला झटका..
पार्किंगचा कंटाळा असणाऱ्यांसाठी Denza Z9
पाण्यात माशासारख्या तरंगणाऱ्या मॉडेलबद्दल जाणून घेतल्यानंतर पुढचं मॉडेल आहे ते म्हणजे Denza Z9. ही एक प्लग इन हायब्रिड SUV असून, BYD बास 3.0 ने अद्यावत आहे. यात 33 सेन्सरसह दोन लायडर युनिट देण्यात आले आहे. याशिवाय यात ऑटोनॉमस पार्किगसह हायवे नॅव्हिगेशनसह फिचर देण्यात आलं आहे. पार्किंग करण्याचा तुम्हाला कंटाळा असेल तर, ही कार तुमची बेस्टी बनू शकते. कारण याची मागील चाके पुढच्या चाकांच्या विरुद्ध वळू शकतात. ज्यामुळे पार्किंग सोपे होते. सगळ्यात महत्त्वाचं फिचर म्हणजे या कारचा दरवाचा व्हॉईस कमांडदेऊनही उघडता येऊ शकतो.
चीनची रोल्स रॉयस : रेड फ्लॅग E-HS9
यानंतर ई कार्सच्या दुनियेत धुमाकूळ माजवणारं चीनमधील चौथं मॉडेल आहे ते म्हणजे रेड फ्लॅग E-HS9 मॉडेल. ही कार चायनीज रोल्स रॉयस नावानेदेखील ओळखली जाते. ही कार सर्व पातळ्यांवर अगदी लक्झरीचा अनुभव देते. यात असलेल्या अडव्हान्स सेंन्सर आणि इंटेलिजंट स्युट कंट्रोल सिस्टममुळे पॅरेलल पार्किंगची सुविधा मिळते. याशिवाय सनरूफ देण्यात आले असून, गाडीचा आतील भाग एखाद्या पंचातारांकित हॉटेलमधील लाऊंजमध्ये बसल्याचे भासवते.
एक एप्रिलपासून कार कंपन्यांनी वाढवल्या किंमती; कोणत्या कारसाठी किती लागणार जास्तीचे पैसे?
टूण-टूण उड्या मारणारी BYD U9
वरील सर्व गाड्यांचे फिचर्स वाचून नक्कीच तुम्हाला लक्झरी अनुभव आला असेल. तर, मग आता थोडसं उड्या मारणाऱ्या गाडीत बसूया. आता उड्या मारणारीगाडी म्हटलं तर, तुम्हाला भारतीय रस्त्यांवरून जाताना बसणारे हादरे वाटतील पण ही गाडी अगदी खड्डे विरहित सपाट रस्त्यावर टूण-टूण उड्या मारते. हे मॉडेल BYD U9 असून, यात BYD डिसस X हायड्रॉलिक ससपेन्शन बसवण्यात आले आहेत. यामुळे गाडीसमोर आलेला एखादा अडथळा पार करण्यासाठी ही गाडी उडी मारून मार्ग काढते यामुळे कारचा डॅमेज होण्यापासून बचाव होतो. त्याशिवाय ही कार 1287 हॉर्सपॉवरच्या मदतीने अवघ्या दोन सेकंदात 0 ते 60 माईल्स पॉवर प्रतितास वेगाने धावू शकते.
एकंदरीतच गेल्या काही वर्षांपासून वाहन चालकांमध्ये वाढत्या लक्झरी कार्सची क्रेझ अन् मार्कटमध्ये आलेल्या नव-नवीन पेट्रोल अन् इलेक्ट्रिक कार्सच्या मार्केटमध्ये चीनमधील ऑटो सेक्टर कात टाकत पुढे जाऊन संपूर्ण वाहन उद्योगात अक्षरक्षः धुराळा उडवत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे चायना ऑक्टो सेक्टरमध्ये कार्समध्ये होणारे बदल पाहता अन्य कार उत्पादक कंपन्या काय करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Why Chinese cars are killing the auto market… pic.twitter.com/23pgM9N2bD
— Harsh Goenka (@hvgoenka) April 2, 2025