मारुतीची 8 सीटर कार, भन्नाट फिचर्स, दमदार इंजिन अन् डिस्काउंट तब्बल 3.15 लाखांचा
![मारुतीची 8 सीटर कार, भन्नाट फिचर्स, दमदार इंजिन अन् डिस्काउंट तब्बल 3.15 लाखांचा मारुतीची 8 सीटर कार, भन्नाट फिचर्स, दमदार इंजिन अन् डिस्काउंट तब्बल 3.15 लाखांचा](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Maruti-Suzuki-Invicto-Discount-Offer_V_jpg--1280x720-4g.webp)
Maruti Suzuki Invicto Discount Offer: फेब्रुवारी महिन्यात जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी भारतीय बाजारात (Indian Market) मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) एक भन्नाट डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही 8 सीटर एमपीव्ही इन्व्हिक्टो (Maruti Suzuki Invicto) अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.
या कारमध्ये तुम्हाला दमदार फीचर्ससह पावारफुल्ल इंजिन देखील मिळणार आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी या कारच्या अल्फा व्हेरिएंटच्या MY2025 मॉडेलवर 2.15 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये 1 लाख रुपयांची एक्सचेंज ऑफर समाविष्ट आहे तर या कारवर 1.15 लाख रुपयांची स्क्रॅपिंग ऑफर देखील सुरू आहे.
इन्व्हिक्टोच्या MY2024 स्टॉकवर 3.15 लाख रुपयांची (अल्फा व्हेरिएंट) सूट दिली जात आहे. तर झेटा व्हेरिएंटवर 2.65 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. भारतीय बाजारात मारुती सुझुकी इन्व्हिक्टोची एक्स-शोरूम किंमत 25.21 लाख रुपये ते 29.22 लाख रुपये आहे.
Maruti Suzuki Invicto इंजिन आणि पॉवर
कंपनीने मारुती इन्व्हिक्टोमध्ये 2.0-लिटर पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर आहे. हे इंजिन 186 bhp ची पॉवर आणि 206 Nm टॉर्क जनरेट करते. मारुती इन्व्हिक्टो 9.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. ते प्रति लिटर 23.24 किमी प्रति लिटर मायलेज देते. इन्व्हिक्टो 7-सीटर आणि 8-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Maruti Suzuki Invicto फीचर्स
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या कारमध्ये भन्नाट फीचर्स देण्यात आले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये 10.1 -इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वेंटीलेटेड फ्रंट सीट्स आणि अॅम्बियंट लाइटिंग सारखी फीचर्स देण्यात आली आहे.
अमित शाहंची बैठक, आतिशींचा राजीनामा…दिल्लीत सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग
तर दुसरीकडे सेफ्टीसाठी या कारमध्ये 6-एअरबॅग्ज,व्हीकल स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स सारखी फीचर्स देखील देण्यात आली आहेत.