थांबा ओ, ‘या’ दिवशी भारतीय बाजारात लाँच होणार Maruti Suzuki Swift CNG

थांबा ओ, ‘या’ दिवशी भारतीय बाजारात लाँच होणार Maruti Suzuki Swift CNG

Maruti Suzuki Swift CNG : देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) मे महिन्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात उत्तम फीचर्स, पावरफुल इंजिन आणि दमदार मायलेजसह 4th Gen Swift लाँच केली आहे. या कारमध्ये कंपनीने 1.2-लिटर, 3-सिलेंडर Z12E नेचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 82hp आणि 112Nm टॉर्क निर्माण करते.

4th Gen Swift मध्ये कंपनीने 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि पर्यायी 5-स्पीड AMT सह उपलब्ध करून दिले आहे. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय बाजारात पुन्हा एकदा मारुती सुझुकी मोठा धमाका करत 4th Gen Swift CNG लाँच करू शकते. माहितीनुसार, 4th Gen Swift CNG पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी मोडमध्ये पॉवर आणि टॉर्क आउटपुट कमी असू शकते आणि ते फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध असेल.

4th Gen Swift CNG किंमत

भारतीय बाजारात मारुती सुझुकीने 4th Gen Swift 6.49 लाख ते 9.64 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमती दरम्यान लाँच केले आहे तर 4th Gen Swift CNG पेट्रोलच्या तुलनेत 90-95 हजार रुपयांनी महाग असणार असल्याची चर्चा आहे. मात्र सीएनजी पॉवरट्रेनसह कंपनी कोणत्या कोणत्या व्हेरियंट लाँच करणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

4th Gen Swift CNG मायलेज

4th Gen Swift ला मॅन्युअल गिअरबॉक्ससह 24.8 KMPL मायलेज आहे तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 25.75 KMPL मायलेज कंपनीकडून देण्यात आले आहे. तर समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी 4th Gen Swift CNG मध्ये 32 पेक्षा जास्त मायलेज देणार आहे.

शाहरुख आणि करण जोहर समलैंगिक संबंध ठेवायचे, गायिकेने केला खळबळजनक दावा

भारतीय ऑटो बाजारात 4th Gen Swift CNG कार Hyundai Grand i10 Nios आणि Tata Tiago सारख्या लोकप्रिय हॅचबॅक कार्सला टक्कर देणार आहे. बाजारात होत असलेल्या चर्चांनुसार पुढील काही महिन्यात भारतीय बाजारात कंपनी 4th Gen Swift CNG लाँच करणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube