ग्राहकांनो, ह्युंदाई देत आहे बंपर ऑफर, ‘ह्या’ कार्सवर 30 हजार रुपयांपर्यंत सूट

ग्राहकांनो, ह्युंदाई देत आहे बंपर ऑफर, ‘ह्या’ कार्सवर 30 हजार रुपयांपर्यंत सूट

Hyundai Cars Discount : नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय बाजारात ह्युंदाईने जबरदस्त ऑफर जाहीर केला आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही Hyundai Grand i10 Nios, Hyundai Aura, Hyundai Exter, Hyundai i20 आणि Hyundai Venue सारख्या कार्स स्वस्तात खरेदी करू शकतात. या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस यांचा समावेश आहे.

Hyundai Grand i10 Nios

भारतीय बाजारात या कारची किंमत 5.92 लाख ते 8.56 लाख रुपयांपर्यंत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2025 मध्ये Hyundai Grand i10 Nios वर एकूण 23 हजार रुपयांपर्यंतची ऑफर देण्यात आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या ऑफरमध्ये 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 3 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस आणि 10 हजार रुपयांपर्यंत रोख सूट देण्यात येत आहे. ही ऑफर सर्व पेट्रोल (मॅन्युअल आणि AMT) आणि CNG व्हेरियंटवर उपलब्ध आहे. याच बरोबर कंपनी Era व्हेरियंटवर 5 हजार रुपयांपर्यंतची रोख सूट देत आहे.

Hyundai Aura

भारतीय बाजारात या कारची किंमत 6.49 लाख ते 9.05 लाखांदरम्यान आहे. सध्या कंपनीकडून या कारवर देखील बंपर ऑफर जाहीर करण्यात आली आहे. माहितीनुसार, या कारवर कंपनी 23 हजारांची सूट देत आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 10 हजार रुपयांची रोख सवलत आणि 1 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस देत आहे. कंपनीकडून ही सूट सीएनजी आणि पेट्रोल व्हेरियंटवर देण्यात येत आहे.

Hyundai Exeter

Hyundai Exeter वर देखील कंपनी जानेवारी महिन्यात डिस्काउंट ऑफर देत आहे. भारतीय बाजारात या कारची किंमत 6 लाख ते 10.43 लाखांदरम्यान आहे. जानेवारी महिन्यात या कारवर ग्राहकांना 15 हजार रुपयांची सूट कंपनीकडून देण्यात येत आहे. या ऑफरमध्ये 10 हजारांची रोख सूट आणि 5 हजारांचा एक्सचेंज बोनस देत आहे. सीएनजी आणि पेट्रोल व्हेरियंटवर तुम्हाला डिस्काउंट ऑफर मिळणार आहे.

Hyundai i20

भारतीय बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी Hyundai i20 देखील कंपनीकडून ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही या कारवर 25 हजार रुपयांची सूट प्राप्त करू शकतात. या ऑफरमध्ये तुम्हाला 15 हजारांची रोख सूट तर 10 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर कंपनीकडून देण्यात येत आहे. भारतीय बाजारात या कारची किंमत 7.04 लाख ते 11.21 लाखांदरम्यान आहे. कंपनी या कारच्या सर्व मॅन्युअल व्हेरियंटवर ही ऑफर देत आहे. तर ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 10 हजारांची सूट देत आहे.

Video: मक्का, मदिना शहर हाय अलर्टवर, सौदीत पावसाचा हाहाकार!

Hyundai Venue

Hyundai Venue देखील तुम्हाला जानेवारी महिन्यात बंपर ऑफर देण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात या कारवर तुम्हाला 25 हजार रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला 15 हजारांची रोख सूट आणि 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस कंपनीकडून देण्यात येत आहे. ही ऑफर 1-लिटर टर्बो पेट्रोल मॅन्युअल आणि DCT व्हेरियंटवर उपलब्ध आहे. भारतीय बाजारात या कारची किंमत 7.94 लाख ते 13.53 लाखांदरम्यान आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube