Skoda Kylaq अखेर लॉन्च, 6 एअरबॅग, भन्नाट फीचर्स अन् किंमत फक्त 7.89 लाख

  • Written By: Published:
Skoda Kylaq अखेर लॉन्च, 6 एअरबॅग, भन्नाट फीचर्स अन् किंमत फक्त 7.89 लाख

Skoda Kylaq : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय बाजारात चर्चेत असणारी Skoda ची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आज भारतीय बाजारत लाँच करण्यात आली आहे. कंपनीची नवीन कार सब-फोर-मीटर एसयूव्ही आहे. भारतीय बाजारात या कारची एक्स शोरुम किंमत 7.89 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना ही कार 2 डिसेंबर 2024 पासून बुकिंग करता येणार आहे तर या कारची डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे.

या कारचा लूक Skoda Kushaq सारखा आहे. कंपनीने या कारच्या फ्रंट आणि रियर पार्ट Kushaq सारखा दिसत आहे. तर ग्राहकांना या कारमध्ये 17 इंची अलॉय व्हील्स देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही बजेट रेंजमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही कार फायदेशीर ठरू शकते.

Skoda Kylaq फीचर्स

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या कारच्या इंटीरियरमध्ये लेटेस्ट फीचर्स दिले आहे. तुम्हाला या कारमध्ये ड्युअल डिजिटल स्क्रीन, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, लेदरेट अपहोल्स्ट्री, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ॲम्बियंट लाइटिंग आणि 6-स्पीकर कँटन साउंड सिस्टीम सारख्या फीचर्स पाहायला मिळणार आहे.

तर दुसरीकडे ग्राहकांच्या सेफ्टीसाठी देखील या कारमध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहे. या कारमध्ये कंपनीकडून सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल प्रोग्राम आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट्स, हेडरेस्ट आणि सर्व प्रवाशांसाठी तीन-पॉइंट सीट बेल्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

Skoda Kylaq इंजिन

कंपनीने आपल्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारमध्ये 1.0-लीटर TSI पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 114bhp पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड MT किंवा 6-स्पीड AT सह येणार आहे.

तर या कारचा व्हीलबेस 2.56 मीटर आहे. यात 189 मि.मी. ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. 446 लिटर बूट स्पेस आहे, जे सीट्स कमी करून 1,265 लिटरपर्यंत वाढवता येते. भारतीय बाजारात ही कार Hyundai Venue, Kia Sonet सारख्या कार्सना टक्कर देणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या